शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:29 IST

छत्रपती संभाजी महाराजांचा साहित्यिक, संस्कृत पंडित तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणून गाैरव हाेणे अावश्यक असल्याने त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्याची मागणी सकल मराठी समाजाकडून करण्यात अाली अाहे.

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात यावे अशी मागणी सकल मराठी समाजाच्यावतीने करण्यात अाली अाहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना याबाबतची मागणी करण्यात अाली असून त्याचे निवेदन पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अाले अाहे. साहित्यिक, संस्कृत पंडित, 14 भाषा अवगत असणारा तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणूनही संभाजी महाराजांचा गाैरव हाेणे अावश्यक असल्याने विद्यापीठाला संभाजी महाराजांचे नावे देण्यात यावे असे पत्रात नमूद करण्यात आले अाहे.     18 जुलै 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना मिशनरी जाॅन विल्सन यांनी केली. मुंबई विद्यापीठाचा रंग भगवा आहे, मुंबई विद्यापीठ हे अार्थिक विद्यापीठ आहेच, परंतु विद्यापीठात भारतीयांबराेबर परदेशी विद्यार्थी देखील शिक्षणासाठी येत असतात. त्याकाळी शिक्षण बंदी असताना भाेजपुरी, मराठी, हिंदी, संस्कृत, माेडी, कन्नडी, तामिळ असे बहुभाषिक साहित्य अापल्या विचार काैशल्यावर संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज यांनी निर्माण केले अाहे. खऱ्या अर्थाने साहित्य, कला व शिक्षण यांच्या जाेरावर माणसाला असाध्य ते साध्य करण्याची शक्ती मिळू शकते हे साडेतीनशे वर्षापूर्वी शंभूराज्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले. त्यांच्या बुधभूषण, सातशतक, नखशिकांत, नायिकाभेद अशी उच्च काेटीची मानवी मुल्य व विचार संपदा निर्माण करुन मानवाला विचार बंधनातून मुक्तीचा मार्ग माेकळा केला आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य रक्षण पराक्रम, मुत्सदेगिरी यावर बहुतांश प्रकाश पडलेला अाहे. परंतु साहित्यिक, संस्कृत पंडित व रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणूनही संभाजी महाराजांचा गाैरव हाेणे अावश्यक आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला संभाजी महाराजांचे नाव द्यावे असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात अाले अाहे. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईMumbai Universityमुंबई विद्यापीठSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती