चाकण : अवकाळी पावसाने चाकण व लगतच्या वाकी, पिंपरी, मोई, महाळुंगे इंगळे आदी गावांतील शेतकर्यांच्या बाजरी पिकांसह टोमॅटो पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष दिलीप वाळके व महिला आघाडीच्या चाकण शहराध्यक्षा भारती देशमुख यांनी केली आहे. चाकणसह या भागातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वाकी, ठाकूर पिंपरी या भागात तर घरावरील पत्रे उडाले, तर काही भागांत मोठमोठी झाडे उन्मळून पडली. वीटभट्टी व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले. उन्हाळी बाजरीचे पीक भुईसपाट झाले असून, काही ठिकाणी तर साठवणूक केलेला कांदा पूर्णपणे भिजून गेला. वाकी येथे उन्हाळी बाजरी पूर्णपणे सपाट झाल्याने शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बहुतांशी शेतकरी नुकसानभरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
By admin | Updated: May 22, 2014 05:52 IST