शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी तांदळाला पसंती , नसरापूर आठवडे बाजारात मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:27 IST

तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर येथील सुवासिक तांदूळ बाजारात हंगामाची आवकच १०० क्विंटलने झाली. प्रामुख्याने नसरापूर येथील तांदूळ बाजारात इतर जातीच्या तांदळापेक्षा इंद्रायणी जातीच्या सुवासिक तांदळास मोठी मागणी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनसरापूर : तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर येथील सुवासिक तांदूळ बाजारात हंगामाची आवकच १०० क्विंटलने झाली. प्रामुख्याने नसरापूर येथील तांदूळ बाजारात इतर जातीच्या तांदळापेक्षा इंद्रायणी जातीच्या सुवासिक तांदळास मोठी मागणी आहे.भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नसरापूर येथील उपाबाजारच्या आवारात या वर्षीच्या हंगामातील तांदूळ विक्रीची सुरुवात काटापूजनाने संचालक संपतराव अंबवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप चक्के, अरविंद सोंडकर, किरण घारे, मुरलीधर दळवी व संस्थेचे सचिव चंद्रकांत तांदळे, चंद्रकांत साळेकर आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नसरापूर येथील तांदूळ बाजारातील तांदळाच्या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई व पुण्यातील ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे.नसरापूर बाजारपेठेत येणारा तांदूळ प्रामुख्याने भोर तालुक्यातील तांभाड, हातवे, सोंडे, मोहरी, दीडघर, जांभळी तर वेल्ह्यातील वांगणी खोºयातील कोळवडी, मांगदरी, कातवडी, वांगणी, करंजावणे, मार्गासनी, वाजेघर, दामगुडास्नी, वेल्हा आदी गावांतील तांदूळ ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.या बाजारात व्यापारी व ग्राहक तांदूळ खरेदीसाठी बाजारात आल्याने चोखंदळपणे प्रतीनुसार तांदळाची खरेदी करतात व तांदळाच्या प्रतीनुसारच भाव त्यांच्याकडून दिला जातो.यावर्षीच्या हंगामात इंद्रायणी तांदळास ४५ ते ५० तर रत्नागिरी तांदळास ३२ पर्यंत भाव मिळत आहे. इंद्रायणीसारखा दिसणारा इंडम तांदूळही बाजारात येऊ लागला आहे. तरीही इंद्रायणी आपले स्थान टिकवून आहे असे भोर कृषी उत्पन्न समितीचे संचालक संपतराव अंबवलेयांनी सांगितले.या वेळी नसरापूर येथील तांदूळ बाजारात पूर्वी आंबेमोहर, रत्नागिरी २४ व वरंगळ आदी जातीच्या तांदळाला विशेष मागणी होती. त्यातही सुवासिक आंबेमोहोर तांदळाला विशेष पसंती मिळत असे. नसरापूर येथील तांदूळ बाजारात शेतकरी पौष महिन्यातील यात्रांकरिता लागणाºया खर्चाकरिता मोठ्या प्रमाणात तांदळाची विक्री करतात.भोर व वेल्हे तालुक्यांतील यात्रांचा हंगाम सुरु झाला असल्याने येथील शेतकरी तांदूळ त्वरित विक्रीस आणतात. भोर व वेल्हा तालुक्यांच्या मध्यवर्ती असलेली नसरापूर तांदूळ बाजारपेठ सर्वदूर प्रसिद्ध आहे.

टॅग्स :Puneपुणे