पुणो : मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या लहुजी शक्ती सेनेच्या विष्णू कसबे यांची प्रकृती बिघडल्यानंतरही प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कार्यकत्र्यानी विविध भागांत दगडफेक केली. शनिवारी दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये काही प्रवासी जखमी झाले असून, यामध्ये पीएमपी(शहरबस ) च्या चार तर एका एसटीचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रशासनाकडून संघटनेच्या मागण्या आणि उपोषण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे संतप्त कार्यकत्र्यानी शनिवारी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली. त्याचे पडसाद पुण्यातही उमटले.
याप्रकरणी बिबवेवाडी, लष्कर, वानवडी आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे
काम रात्री उशिरार्पयत सुरु होते. (प्रतिनिधी)
शासनाने लहुजी शक्ती सेनेच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत. कसबे यांची प्रकृती उपोषणादरम्यान चिंताजनक झाली आहे.
- सोमनाथ कांबळे,
प्रदेशाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना