शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयतृतीयेला बाजारात आंब्यांना मागणी वाढली, मार्केटमध्ये तयार मालाचा तुटवडा

By अजित घस्ते | Updated: April 21, 2023 17:12 IST

हवामान बदलांमुळे हापूसच्या आवकमध्ये घट...

पुणे : अक्षयतृतीयेला आमरस पुरीचा बेत व्हायलाच हवा. त्यामुळेच अक्षय तृतीयेला हापूस आंब्याला बाजारात मोठी मागणी असते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मार्केटयार्ड बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती. मात्र चार ते पाच वर्षे नंतर पहिल्यांदाच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तयार आंब्याचा तुटवडा जाणवत असून पेटीमागे ५०० रूपये  महाग मिळत आहेत.

यंदा मात्र अवकाळी पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलांमुळे बाजारात हापूसची आवक कमी झाली आहे. तसेच तयार हापूस बाजारात कमी उपलब्ध असल्याने भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे अजूनही हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. ग्राहक खरेदीसाठी गेले असता त्यांना मालाचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे.

आंब्यांचे भावकिरकोळ बाजारातील डझनाचे भाव - ८०० ते १२०० रुपयेघाऊक बाजारातील भाव४ ते ६ डझन पेटी -२५०० ते ३००० हजार रुपये५ ते १० डझन पेटी - ३५०० ते ६००० रुपये पेटी

आंब्याची आवक कमी; दर मात्र सामान्याच्या आवाक्याबाहेर

दरवर्षी एप्रिल महिन्यात बाजारात हापूसची आवक मोठ्या प्रमाणावर होते. एप्रिल महिन्यात आंब्यांची आवक वाढून दरही टप्प्याटप्प्याने सामान्यांच्या आवाक्यात येत असतात. गेल्या तीन दशकात एप्रिलमध्ये पहिल्यांदाच कोकणातील जयगड, देवगड, शिरगाव, पावस, जैतापूर परिसरातून होणारी आंब्याची आवक कमी झाली. आंबा लागवडीत घट झाल्याने त्याचा फटका छोट्या शेतकऱ्यांना बसला. असला असला तरी सद्या  सामान्याच्या आवाक्या बाहेर हापूस आंबा गेला आहे.

काय आहेत महाग होण्याची कारणे:

- अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा उत्पन्नावर परिणाम- अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्यांची आवक कमी- दरवर्षी आठ ते दहा हजार हापूस पेट्यांची आवक- यंदा हापूसची आवक दोन  ते अदीड हजार पेटीपर्यंत- किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचे ६०० ते १२०० दर चढेच- तयार आंबा बाजारात कमी उपलब्ध 

 यंदा हवामान बदलामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला.  आज मार्केट यार्ड बाजारात  2 ते अडीज हजार पेटी आल्या असून साधारण 800 ते 1200 रुपये डझन भाव आहे. चार ते पाच वर्षानंतर पहिल्यांदाच हापूस आंब्याच्या दराने उंचांक गाठला आहे. ग्राहक आंबा खरेदी करीत आहेत मात्र मालाचा तुटवडा जाणवत आहे. यंदा कोकणातील छोट्या बागयतदारांनी आंबा विक्रीस पाठविला नाही- युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड