शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

आणखी पाणीकपात आता बास, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 1:55 AM

सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी : अनेक भागांत टॅँकरने पाणीपुरवठा

पुणे : शहरातील अनेक भागांत आत्ताच कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागात तर टँकरशिवाय पर्याय नाही. पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आणखी पाणीकपात झाल्यास तीव्र टंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे आणखी कपात नकोच, अशी अपेक्षा सत्ताधारी भाजपासह इतर पक्षांतील अनेक नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. सध्या शहराला मिळणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कपात होण्याची चिन्ह आहेत.

या पार्श्वभूमीवर या नगरसेवकांच्या प्रभागातील पाणीटंचाईच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. भाजपाच्या काही नगरसेवकांनी मात्र सावध भूमिका घेत पाणीकपात होणार नसल्याचे सांगितले, तर काही नगरसेवकांनी पाण्याची बचत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अनेकांनी प्रभागात आताच पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावत असल्याबद्दल नाराजीव्यक्त केली.आतापर्यंत हिवाळ्यात पाणीकपातीचा सामना पुणेकरांना कधीच करावा लागला नाही. शहरात राष्ट्रवादीचा महापौर असताना पाणीकपातीची समस्या कधीही उद्भवली नाही. अजित पवार पालकमंत्री असताना पुणे शहराला कधीही पाण्याची कमतरता भासू दिली नाही. प्रभागातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.- बाबूराव चांदेरे, बाणेर, बालेवाडी पाषाणधरणातील उपलब्ध पाण्याचा साठा कमी असल्याने पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे. नियोजनातून मार्ग काढण्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत.- दिलीप वेडेपाटील, बावधन खु. - कोथरुड डेपोशहरातील पाणीगळती थांबवण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना केल्यास पाणीकपातीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. सद्य:स्थितीत नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.- मंजूश्री खर्डेकर,एरंडवणा-हॅपी कॉलनीप्रभागामध्ये पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाºया नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यांना लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे.- स्वाती लोखंडे,डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनीपुणेकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणारआहे. १३५० एमएलडी पाण्यात कुठल्याहीप्रकारची कपात होणार नाही. पुणेकरांनाकुठल्याही प्रकारच्या पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.- सिद्धार्थ शिरोळे,डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनीपाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. पण त्या तुलनेत सध्या परिस्थिती बºयापैकी स्थिर आहे.- सुनीता गलांडे,वडगाव शेरी-कल्याणीनगरपाणीकपात आहेच. प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना पाणी कमी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. आयुक्तांबरोबर चर्चादेखील केली. पाणी वेळेवर मिळावे, अशी सूचना केली आहे.- गणेश बिडकर, सोमवार पेठकमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. उपाययोजनांची गरज आहे. पाणी नियोजनासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे.- गोपाळ चिंतल, संगम पार्कपहिल्यापासूनच पाण्याचा कमी पुरवठा होत आहे. नागरिकांनी पाणी कमी वापरावे. पाणीप्रश्नावर अनेकदा चर्चा केली आहे.- श्रीकांत जगताप, वडगाव बु., हिंगणे खुर्दपाणी मिळण्याविषयी बºयाच अडचणी आहेत. पाण्याचा दबावदेखील कमी आहे. नागरिकांनी अडचण समजून घ्यावी. मुळातच पाण्याची कमतरता आहे.- रंजना टिळेकर,कोंढवा बु. - येवलेवाडीसध्या दिवसाआड पाणी येत आहे. उपाययोजना म्हणून नवीन पाईपलाईन टाकणार आहोत. तसेच टँकरने पाणीपुरवठा होत आहे.- किरण जठार, कळस-धानोरीसध्या दोन दिवसाआड पाणी येत आहे. प्रभागात पाणी समस्या गंभीर आहे. अधिकाºयांशी सतत चर्चा करीत आहोत.- राहुल भांडारे, विमाननगर-सोमनाथनगरपाणीकपात होणार नाही, याची चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू आहे. पुणेकरांना कुठल्याही प्रकारच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. लवकरात लवकर उपाययोजना अंमलात आणल्या जातील.- मुरलीधर मोहोळ, मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनीआतापर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित आहे; पाणीकपात होत असेल तर टँकरसारख्या पर्यायी उपाययोजना कराव्या लागतील.- श्वेता खोसे,विमाननगर - सोमनाथनगरपाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. याआधी आयुक्तांशी अनेकदा चर्चा केली. सध्या अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.- सुनील टिंगरे, फुलेनगर-नागपूर चाळपाण्याचा दाब पहिल्यापासूनच कमी आहे. पाणी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. लोक प्रबोधनातून पाणीवापराचे संदेश देत असतो. अधिकाºयांबरोबर चर्चा झाली आहे.- रघुनाथ गौडापाणी नियोजन हवेच. नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांची फसवणूक केली. मतदारांच्या विश्वासाला तडा दिला. घोर पाणीटंचाई प्रभागात जाणवत आहे. प्रशासनाच्या वचक राहिलेला नाही.- सुभाष जगताप, सहकारनगर-पद्मावतीपाण्याविषयी तीव्र अडचणी जाणवत आहेत. पाण्यासाठी प्रभागात बोंबाबोंब होत आहे. आतापासूनच टँकरची व्यवस्था केली जात आहे. अधिकाºयांशी सातत्याने चर्चा सुरू आहे.- सुनीता वाडेकर, औंध-बोपोडीमुळात आमचा प्रभाग उंचावर असल्याने आधीच पाणीपुरवठा कमी असतो. आताच टंचाई भासत असल्यामुळे जर पाणीकपात झाली तर अजूनच अडचण येईल.- मारुती सांगडे, कळस-धानोरीआमच्या प्रभागात दिवसाआड पाणी येते. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. याआधी पालिकेत तक्रारदेखील केली होती. परंतु यावर कोणतेही दखल घेतलेली नाही. पण कपातीच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करणार आहे.- रेखा टिंगरे, कळस-धानोरीपहिल्यापासून पाणीपुरवठा व्यवस्थित नाही. याबाबत अनेकदा तक्रार केली होती. पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणीपुरवठा करणार आहे.- फरजाना शेख, फुलेनगर - नागपूर चाळ 

टॅग्स :Puneपुणे