शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

डेल्टा व्हेरिएंट आहे आठ पट शक्तिशाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:24 IST

प्रतिकारशक्ती निष्प्रभ करण्याचे विषाणूमध्ये आहे सामर्थ्य

ठळक मुद्दे“पुनर्निमितीची वाढलेली क्षमता’ आणि लसींमुळे किंवा नैसर्गिक बाधेतून निर्माण झालेली प्रतिपिंडे नाहीशी करण्यासाठीच्या घटलेल्या संवेदनशीलतेने ९० पेक्षा जास्त देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होण्यात मोठी भूमिका आहे.” 

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे/नवी दिल्ली : सार्स-कोव्ह२ विषाणूवर नव्याने झालेल्या अभ्यासात या विषाणूत बाधा करण्याची खूप जास्त क्षमता असून, आधी झालेली बाधा किंवा लसींमुळे निर्माण झालेल्या प्रतिकार शक्तीला तो निष्प्रभ करू शकतो, असे आढळले आहे. ‘नॅचरल जर्नल’मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. भारतातील व इतर देशातील संशोधकांच्या पथकाला डेल्टा व्हेरिएंटमध्ये (किंवा बी.१.६१७.२ लिनिएज) ॲस्ट्राझेनेका किंवा फायझर लसींमुळे मिळालेली प्रतिकारशक्ती निष्प्रभ करण्यात मूळ विषाणूच्या तुलनेत आठ पट शक्यता आढळली आहे. याशिवाय डेल्टा व्हेरिएंट हा कोविड-१९ मधून बरे झालेल्यांना पुन्हा बाधित करण्याची सहापट शक्यता आहे. 

अभ्यासात असे म्हटले आहे की, “पुनर्निमितीची वाढलेली क्षमता’ आणि लसींमुळे किंवा नैसर्गिक बाधेतून निर्माण झालेली प्रतिपिंडे नाहीशी करण्यासाठीच्या घटलेल्या संवेदनशीलतेने ९० पेक्षा जास्त देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होण्यात मोठी भूमिका आहे.” संशोधकांनी दिल्लीत तीन रुग्णालयांतील जवळपास पूर्ण लसीकरण झालेल्या ९ हजार आरोग्य कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये बाधा झाली का याचा अभ्यास केला. 

देशव्यापी मोहिमेत ७० कोटींचे लसीकरण

n    देशात यावर्षी १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत आतापर्यंत ७० कोटींपेक्षा जास्त लोकांना कोविड-१९ वरील लस दिली गेली आहे. यातील शेवटच्या १० कोटी लसमात्रा फक्त १३ दिवसांतील आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले. n    कोरोना विषाणूला पराभूत करायचे असून, लसीकरण हा त्या विजयाकडील मार्ग आहे, असे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर म्हटले. या मोठ्या यशाबद्दल मांडविया यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि जनतेचे अभिनंदन केले आहे. 

n    ८५ दिवसांत १० कोटी लोकांचे लसीकरण, ४५ दिवसांत २० कोटींचा टप्पा ओलांडला आणि ३० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी २९ दिवस लागले.

n    ४० कोटींची पायरी गाठण्यासाठी २४ दिवस लागले, तर ५० कोटींचा टप्पा आणखी २० दिवसांत गाठला. 

n    आणखी १९ दिवसांत ६० कोटींचा आणि फक्त १३ दिवसांत पुढील १० कोटी लोकांपर्यंत लस पोहोचली, असेही ते म्हणाले.

निपाह : केरळातील सर्वच्यासर्व २४ नमुने निगेटिव्ह n    निपाह विषाणूच्या संशयामुळे केरळमधील ८ जणांचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीला पाठवलेले सर्व २४ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत.n    केरळच्या आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांनी सांगितले की, आम्ही आणखी नमुन्यांची तपासणी करत आहोत. घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे