शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

डेल्टा सिरॅमिक संशोधनातून नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:24 IST

गुडघ्याचा नवीन सांधा बसवल्यानंतर काही काळाने झीज होऊन तो बदलावा लागतो. डेल्टा सिरॅमिक, मेटलमध्ये संशोधन सुरू असून, ते यशस्वी

गुडघ्याचा नवीन सांधा बसवल्यानंतर काही काळाने झीज होऊन तो बदलावा लागतो. डेल्टा सिरॅमिक, मेटलमध्ये संशोधन सुरू असून, ते यशस्वी झाल्यास एकदा बसवलेला सांधा ४० वर्षे वापरता येईल. बरेचदा रुग्ण इंटरनेटच्या साह्याने व्याधी आणि उपचार याबाबत माहिती मिळवतात. परंतु, एकाच वेळी २-३ व्याधी असल्यास डॉक्टर एकत्रित विचार करून उपचार करू शकतात. इंटरनेट ते काम करू शकत नाही, असे मत ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी वाढदिवसानिमित्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.माझा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील किराणामालाचे दुकान चालवत असत. मी अभ्यासातही हुशार नव्हतो. दहावीला कमी गुण मिळाले होते. त्यानंतर मात्र करिअरकडे गांभीर्याने पाहायचे ठरवले. आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी असल्याने प्रवास सुसह्य झाला आहे. आजपर्यंत ५१ वर्षे रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली आहे. वयाच्या ८२व्या वर्षीही रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही कारणाने गुडघ्याचे सांधे खराब झाले की ते बदलणे ही खर्चिक बाब असते. परदेशी तंत्रज्ञानाच्या साह्याने सांधे बदलासाठी १ लाख रुपयाच्या दरम्यान खर्च येतो. या तुलनेत भारतीय बनावटीचा सांधा बसवण्याचा खर्च केवळ २५-३० हजार रुपये असतो. सांधा-बदलाबाबत मी केलेल्या संशोधनाला २००५ मध्ये पेटंट मिळाले. आजवर मी २० हजार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पूर्वी शस्त्रक्रिया करून नवा सांधा बसवल्यानंतर तो वाकत नसे. आता अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया सुलभ झाली आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रमाण गेल्या २ वर्षांमध्ये वाढले आहे. यामध्ये सांध्याचा सिटी स्कॅन केला जातो. सॉफ्टवेअरच्या आधारे हाड किती कापायचे अथवा घासायचे, हे रोबोटद्वारे ठरवून अत्यंत सुलभ शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णाच्या वेदना कमी होऊन त्याला २ दिवसांमध्ये घरी जाता येते. पूर्वी लहान-मोठा अपघात झाल्यानंतर प्लास्टर घालून उपचार करता येणे शक्य होते. आता भरधाव वाहनांनी धडक दिल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघातामुळे ४-५ हाडे मोडतात. अशा वेळी शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसतो. अद्ययावत उपकरणांमुळे शस्त्रक्रिया सोपी झाली आहे. सांधेरोपण आणि हाडे बसवण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये खूप प्रगती झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर एक-दोन दिवसांत रुग्णाला घरी जाता येते, त्याच्या प्रकृतीतही झपाट्याने सुधारणा होते. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनाही तंत्रज्ञानामुळे कमी झाल्या आहेत. सध्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.भारतात गुडघ्यांच्या विकारांचे प्रमाण खूप जास्त आहे. हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये जास्त आहे. कमी चालणे, उन्हात न जाणे यामुळे माझ्याकडे येणाऱ्या एकाआड एक रुग्णांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते. ३० वरून हे प्रमाण १०-१२ पर्यंत घटले आहे. हाडांचे दुखणे लोक गांभीर्याने घेत नाहीत, नियमित व्यायाम, सकस आहार ही आरोग्यसंपन्न जीवनाची गुरुकिल्ली आहे. केवळ चालण्याचा व्यायाम करून सुदृढ राहता येत नाही. स्नायूंच्या विकासासाठी सूर्यनमस्कार हा जगातील सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे सर्वांनी व्यायामावर भर द्यायला हवा. बरेचदा हाडांचे दुखणे अंगावर काढले जाते. दुर्लक्ष केल्याने काही कालावधीने मोठे दुखणे उद्भवते. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत. कंझ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्टमुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील भावनिक नाते कमी झाले आहे. डॉक्टर खूप व्यस्त असल्यामुळे त्यांना रुग्णांशी संवाद साधता येत नाही. डॉक्टर आपल्याकडून पैसा उकळतात, अशी भावना रुग्णांमध्ये वाढीस लागते. एखाद्या डॉक्टरचे मत न पटल्यास सेकंड ओपिनियन घेण्यास प्राधान्य दिले जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाचा पूल निर्माण व्हावा. वैद्यकीय शिक्षण घेत असताना खूप पैसा खर्च होत असल्याने प्रत्यक्ष प्रॅक्टिसला सुरुवात केल्यावर डॉक्टर व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारतात. व्यावसायिक व्हायला हरकत नाही, मात्र, रुग्णांशी प्रामाणिक राहणेही गरजेचे आहे. त्यासाठी प्रेम, आस्था निर्माण व्हायला हवी. आत्मचरित्र लिहिण्याचा विचार असल्याचेही संचेती म्हणाले.