शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफाॅर्मवर महिलेची प्रसुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 21:09 IST

पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटावर एका महिलेची प्रसुती झाली. तिला तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली.

पुणे : वेळ सकाळी 10.45  ची. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांकावरतीनवर नऊ महिन्यांची गर्भवती असलेली महिला उभी..अचानक तिच्या साडीवर एका मुलाला रक्ताचे डाग दिसतात आणि तो डॉक्टरांना पाचारण करण्यासाठी तात्काळ वैद्यकीय केंद्राच्या दिशेने धाव घेतो....डॉक्टर आणि परिचारिका येतात...त्या महिलेची फलाटावरच सर्वसामान्य पद्धतीने प्रसुती होते.

हा खरंतर एका चित्रपटाला शोभेल असाच प्रसंग. पण ही घटना शुक्रवारी पुण्यात घडली आणि हजारो प्रवासी या घटनेचे साक्षीदार ठरले. सोनाली दत्ता केंद्रे ( 35 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. पावणे अकराच्या सुमारास त्या पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीवर रक्ताचे डाग असल्याचे एका मुलाच्या निदर्शनास आले. या मुलाने डॉक्टरांना पाचारण करण्यासाठी ताबडतोब वैद्यकीय केंद्राच्या दिशेने धाव घेतली.पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वे अधिकारी विनीत कुमार आणि आरपीएफ कर्मचारी एस. एम. माने यांनी संबंधित महिलेला होत असलेल्या रक्तस्त्रावाची माहिती आदित्य बिर्लाच्या मोफत वैद्यकीय निगा केंद्रात फोन करून कळवली. त्यानंतर लागलीच रेल्वे कर्मचा-यांसोबत डॉक्टर माया रोकडे आणि परिचारिका सरिता माने यांनी फलाट गाठले. त्यांनी प्रसूती प्रक्रियेला तातडीने सुरुवात केली आणि सर्वसामान्य पद्धतीने प्रसूती पार पाडली.        मात्र सुरुवातीला बाळ रडले नसल्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यामुळे बाळाला संवेदना जाणवतील अशा पद्धतीने त्याला हाताळल्यावर ते लागलीच रडू लागले. त्यानंतर आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचा-यांनी लगेच माता-अर्भकाची स्थिती स्थिर केली आणि दोघांचे आरोग्य सामान्य असल्याची खातरजमा केली. बाळ-आईची योग्य ती तपासणी झाली. यावेळी बाळाचे वजन 3 किलो इतके भरले. नवजात शिशू (मुलगी)सोबत रुग्णाला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या डॉ. माया रोकडे यांनी दिली.

आमचे वैद्यकीय कर्मचारी अशा पद्धतीची आपतकालीन स्थिती हाताळण्यासाठी कायमच तत्पर असतात.रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांकडून आम्हाला मिळणारे सहकार्य अद्वितीय असते. माता आणि अर्भक सुखरूप असल्याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी आपली भावना व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाpune railway stationपुणे रेल्वे स्थानक