शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी जन्मल्यावर प्रसूती खर्च माफ; डॉ. गणेश राख यांचं स्तुत्य पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:48 IST

ती नकुशी वाटू नये यासाठी राख यांचा प्रयत्न

लाखेवाडी : सध्या मूल जन्माला येणेसुद्धा प्रचंड खर्चिक झाले आहे, छोट्या खासगी प्रसूतीगृहात नॉर्मल बाळांतपणासाठी दहा हजारांच्या आसपात तर सिझरिंगसाठी तब्बल २५-३० हजारांचा खर्च येतो. या वाढत्या खर्चामुळेही अनेकदा लिंगनिदान करून मुलींना गर्भातच संपविण्याचेही प्रमाण वाढत आहे.त्याला आळा घालण्यासाठी येथेल डॉ. गणेश राख यांनी त्यांच्या रुग्णालयात मुलगी जन्मल्यास प्रसूतीचा खर्च मात्र करून नव्या मुलीच्या स्वागतासाठी केक व मिठाई वाटून रुग्णालयात आनंदोत्सव करण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. याबाबत डॉ. राख यांच्याशी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे ‘लोकमत’ने त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले. ‘या बेटी बचाओ’ जनआंदोलनात आतापर्यंत दोन लाखा-पेक्ष्या जास्त वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला आहे. हजारो लहान खाजगी दवाखाने, काही मोठे कापोर्रेट दवाखाने व इतर दवाखान्यानी बेटी बचाओ जनआंदोलन या उपक्रमात सहभागी होऊन त्यांच्या दवाखान्यात मुलगी जन्माला आल्यास मोफत प्रसूती किंवा आर्थिक सूट दिलेली आहे. तसेच लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत, कॅलेंडर, दैनंदिन डायरीवर बेटी बचाओ जनआंदोलनाचा उल्लेख करणे, तसेच निरनिराळ्या राज्यात बेटी बचाओ जनआंदोलनाच्या मिरवणुकींचे आयोजन करणे अशा अनेक मार्गानी बेटी बचाओ जनआंदोलन पुरस्कार केला जात आहे. १६ लाखांपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बेटी बचाओ जनआंदोलन या उत्साहवर्धक उपक्रमात सहभाग घेतलेला आहे.या स्वयंस्फूर्त स्वयंसेवकामध्ये निम्न-वैद्यकीय क्षेत्र, वकील, प्राध्यापक , शिक्षक, सराफ , ज्वेलर्स, नाभिक, प्रवासी कंपन्या, विवाह आयोजक व सर्वसामान्य रिक्षावले यांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन ज्या सामाजिक व आर्थिक बाबीमुळे मुलीचा जन्म निषिद्ध ठरविला गेला, त्या बाबतीत सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला.परिस्थितीमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. विशेषत: समाजातील गरीब व मध्यम वर्गाच्या लोकांच्या मनस्थितीत असा बदल झाला आहे की, हे लोक पूर्वी मुलगी झाल्यास वैद्यकीय बिलाचा खर्चसुद्धा द्यावयास तयार नसायचे.परंतु, आता परिस्थिती बदलली आहे, अनेक कुटुंबे आता मुलीच्या जन्माचा स्वीकार करीत आहे.लॅनसेट मेडिकल जर्नल २०१८ यांच्या अहवालानुसार गेल्या अनेक वर्षांत लिंगभेदभावामुळे ०-५ या वयोगटातील २.४० कोटी म्हणजेच दरवर्षी २.४० लाख मुलींना मारून टाकण्यात आले आहे. हे सर्व मृत्युकांड टाळता येण्याजोगी होते. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. केवळ प्रसूती खर्च माफ केल्याने जनजागृती होणार नाही ती केवळ एक सुरुवात आहे. महिलांना सन्मान मिळण्यासाठी आपला लढा असल्याची माहिती डॉ. गणेश राख यांनी दिली.

टॅग्स :doctorडॉक्टरPuneपुणे