शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीला मुजरा करायला जात नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 6, 2024 21:28 IST

शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा किवळे येथे शनिवारी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

पिंपरी : सध्याचे महायुती सरकार विकासाचा मुद्यावर काम करत आहे. दोन दिवसाला आम्ही दिल्लीला जातो, यामुळे काहींच्या पोटात पोटशूळ उठत आहे. मात्र, आम्ही दिल्लीला मुजरा करायला जात नाही तर विकासकामे मंजूर करून आणायला जातो, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा किवळे येथे शनिवारी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, इरफान सय्यद, शीतल म्हात्रे, बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, मी फिल्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे. महाविकास आघाडी काळात अहंकारी माणसामुळे राज्याचा विकास खुंटला होता. या सरकारमुळे राज्याला केंद्राचे पाठबळ मिळत आहे. दीड वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सर्वसामान्यांच्या आयुष्यात अच्छे दिन आणण्यासाठी आहे. महायुती मजबूत आहे. इंडी आघाडीकडे नेतृत्व नाही. मात्र, महायुतीकडे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे २०२४ ला महायुतीचे सरकार नक्कीच येणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्र स्वच्छ करू...

शिंदे म्हणाले, दीड वर्षांमध्ये जे काम केले त्याची पोचपावती जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत दिली. या राजकीय दलदलीत फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्र स्वच्छ करून आम्ही थांबू, असा इशाराही शिंदे यांनी दिला. आज सभेला जेवढे उपस्थित होते तेवढे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर महाविकास आघाडीचे डिपॉझिट जप्त होईल.---सर्वसामान्यांना आनंद झाला...

शिंदे म्हणाले, सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा काहींना भविष्याविषयी चिंता होती. मात्र, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोबत घेऊन निघालो. म्हणून आज सत्तेत आहोत. मी मुख्यमंत्री झाल्याचे सर्वसामान्य नागरिकांना आनंद झाला. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, या बाळासाहेबांच्या शब्दाला जागलो. शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी मी धाडसी निर्णय घेतला. गहाण ठेवलेला धनुष्यबाण वाचवला, असे ते म्हणाले.

शास्ती रद्द करून दाखवला..शिंदे म्हणाले, २०१९ ला श्रीरंग बारणे यांना शब्द दिला होता. पिंपरी-चिंचवड शहारातील शास्ती कर रद्द केला. तसा अनधिकृत बांधकामाचा प्रश्नही मार्गी लावू. इंद्रायणीबरोबरच इतर नद्यांचाही डीपीआर तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPuneपुणेShiv Senaशिवसेना