शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी निवडणुकीत गुंतल्याने पाणीटंचाई निवारणाला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:25 IST

गावांची होरपळ सुरूच : रुग्णालय, शाळांमध्ये नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल

दौंड : दौंड तालुक्यात बहुतांशी भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि पदाधिकारी गुंतलेले असल्याने टंचाई निवारणाकडे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे. तर, काही भागांत पाणीटंचाई दूर करण्यासाठी अधिकाऱ्याकडून विलंबदेखील होत आहे.

दौंड शहर आणि ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणू लागली आहे. दौंड शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे पाणीटंचाई आहे. तर दुसरीकडे, ग्रामीण भागातील तलाव आटल्याने ठिकठिकाणी पाणीटंचाई सुरू आहे. पाटस येथे आठ दिवसांपासून पाणीटंचाई आहे. अशीच परिस्थिती इतर गावांत आहे. त्यामुळे जनतेच्या पाणीप्रश्नावर राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कामकाज म्हणून निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. तेव्हा पाणीप्रश्नावर आलेले प्रस्ताव प्रलंबित आहेत. शासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी या दोघांच्या संगनमताने जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत ग्रामपातळीवर कामकाज सुरू असते. मात्र, अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांचा मेळ बसत नसल्याने पाणीप्रश्नासंदर्भात आलेल्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने बहुतांशी भागात पाणीटंचाई सुरू आहे. पाणीप्रश्नावर आणीबाणी आली, तर तेथे तातडीने पाणीप्रश्न सोडविला जात आहे.४दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाण्याची टंचाई लक्षात घेता, तातडीने रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने टँकर सुरू करण्यात आला. असाच निर्णय ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत घेणे गरजेचे आहे.४सध्याच्या परिस्थितीत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे बहुतांशी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी सदस्य निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले आहेत.

टॅग्स :Tapi riverतापी नदीPuneपुणे