शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूची माहिती देण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:42 IST

घरमालकांचे दुर्लक्ष : पोलिस ठाण्यात नोंद आवश्यक

कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर म्हणजे पुणे शहरापासून जवळचा जलद गतीने विकसित होत असलेला भाग; जिथे व्यवसाय-नोकरीसाठी दुरदुरून माणसे वास्तव्यास येत आहेत. यामुळे या परिसरात घर भाड्याने देण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घरमालकाने घर भाड्याने देताना भाडेकरूची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करणे बंधनकारक असताना घरमालकांचे या नोंदणीकडे साफ दुर्लक्ष होत आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध कारणांनी स्थायिक होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. वास्तव्यास आल्यानंतर भाड्याने घर घेऊन राहणाºयांचे प्रमाण यामुळेच वाढलेले आहे. नवीन वसाहतीमध्ये भाड्याने घर उपलब्ध होऊ लागल्याने भाडेकरू घर भाड्याने घेऊन स्थिरावत आहेत. घर भाड्याने घेताना प्रत्येकाने आपली नोंद पोलीस ठाण्यात करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत निरुत्साह दिसून येत आहे.

समाजकंटक, दहशतवादी हे कुठेही लपून राहू शकतात. अशी समाजविघातक मंडळी ज्या अपार्टमेंट, बंगला किंवा चाळींमध्ये भाडेकरू म्हणून वास्तव्यास असतात, त्या परिसरातील त्यांचा वावर कोणाला संशय येणार नाही, असा असतो. परिसरातील रहिवाशांना त्यांच्याकडून कोणताही त्रास नसल्याने तेही अशा व्यक्तींविरुद्ध तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. परंतु, घरमालकांनी भाडेकरू ठेवताना अशा सर्वच बाबींची दक्षता बाळगण्याची गरज आहे. भाडेकरू ठेवताना त्याचे मूळ गाव, व्यवसाय, कुटुंबातील सदस्यांची संख्या, नातेवाईक, फोन नंबर, अशी सर्व माहिती घरमालकाने स्वत:कडे तसेच अपार्टमेंटच्या अध्यक्षांकडे आणि पोलिसांकडे देण्याची आवश्यकता आहे. पोलिसांकडून भाडेकरूंची संपूर्ण माहिती ठाण्यात देण्याचे आवाहन यापूर्वी वारंवार करण्यात आलेले आहे. तरीही, बहुतेक घरमालकांनी भाडेकरूंची माहिती कळविलेली नसल्याचे दिसून येते.घरमालकांमध्ये निरुत्साहघर भाड्याने देताना घरमालकाने भाडेकरूविषयी संपूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे. मात्र, घरमालक याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांची नोंदणी करण्यातही त्यांनाफारसा रस नसतो.भाडेकरूविषयी माहिती देण्याचा फॉर्म पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध आहे. तरी, पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येत आहे, की लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत असणाºया घरमालकांनी लवकरात लवकर आपल्या भाडेकरूंविषयीची माहिती पोलीस ठाण्यामध्ये द्यावी. या प्रकरणी दोषी आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल.- क्रांतिकुमार पाटील, पोलीस निरीक्षक,लोणी काळभोर पोलीस ठाणे

टॅग्स :Puneपुणे