शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दीपक मानकर अजूनही ससून रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 12:24 IST

बुधवारी मानकर यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अजूनही तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

पुणे : सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. मात्र, त्याच रात्री बुधवारी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अजूनही तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे़.

सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मानकर बुधवारी सकाळी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांच्या कार्यालयात हजर झाले. गेल्या आठवड्यात मानकर यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. तसेच पुढील १० दिवसांत पोलिसांना शरण जाण्याचे आदेश मानकर यांना न्यायमूर्ती कुरीन जोसेफ आणि न्यायमुर्ती संजय किशन कौल यांनी दिला होता. त्यानुसार मानकर शरण आले. 

पोलिसांनी त्यांच्यासह इतरांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. त्यांना बुधवारी सायंकाळी न्यायालयात हजर केले. विशेष न्यायाधीश ए. एस, महात्मे यांनी मानकर यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर दीपक मानकर यांना पोलीस कोठडीत नेण्यात आले. त्याच रात्री त्यांनी आपल्या छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड अधिक तपास करीत आहेत. त्यांनी सांगितले की, पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Puneपुणे