शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विस्कटलेली सामाजिक वीण पूर्ववत करणार - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 01:16 IST

१ जानेवारीला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात झालेल्या दंगलीमुळे महाराष्ट्राची विस्कटलेली सांस्कृतिक वीण पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तयारी केली आहे.

कोरेगाव भीमा : १ जानेवारीला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात झालेल्या दंगलीमुळे महाराष्ट्राची विस्कटलेली सांस्कृतिक वीण पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तयारी केली आहे. राज्यासह देशभरातून येणाऱ्या समाजबांधवांचे सामाजिक बांधिलकीतून परिसरातील स्थानिक नागरिक स्वागत करणार असल्याने महाराष्ट्राची सामाजिक एकतेची परंपरा कायम राहण्यास मदत होणार आहे, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.१ जानेवारीला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया नागरिकांच्या सुख-सुविधांची व विजयस्तंभ परिसर, तसेच कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक (ता. शिरूर) या परिसराची पाहणी करण्यासाठी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर रविवारी आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, लोणी कंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आदी उपस्थित होते. यावेळी केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.केसरकर म्हणाले, ‘‘ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया नागरिकांसाठी ११ ठिकाणी वाहनतळ व इतर सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेची हमी प्रशासनावर असतानाच परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही. गतवर्षीच्या १ जानेवारीला असलेल्या पोलीस बंदोबस्तापेक्षा यावर्षी १० पटीने जास्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ’’१ जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभास महाराष्ट्रासह देशभरातून येणाºया समाजबांधवांच्या स्वागतासाठी पोलिसांनी परिसरातील गावोगाव बैठका घेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असल्याने सर्वत्र सामाजिक एकतेची भावना जागृत झाली आहे. त्यातूनच परिसरातील मानवंदनेसाठी येणाºया समाजबांधवांचे फुले, पाणी देऊन स्वागत करणार असल्याचेस्थानिक नागरिकांनीही आश्वासनदिले असल्याने सामाजिकएकतेचा संदेश महाराष्ट्रासह देशाला जाणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.मानवंदनेसाठी येणाºया बांधवांना सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. याचा आढावा पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे घेत आहेत. येथील खाण्यापिण्याची व्यवस्था, बसने अंतर्गत वाहतूक, १५० पाण्याचे टँकर, १० किलोमीटर अंतरावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेºयांसह ड्रोन कॅमेºयानेही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अग्निशमन, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत राज्य शासनाने यावेळी विशेष उपाययोजनाही केल्या असल्याने मानवंदनेसाठी येणाºया समाजबांधवांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या वर्षी दरवर्षीपेक्षा जास्त बंदोबस्त असून सर्वाधिक पोलीस बंदोबस्त परिसरात असल्याचे सांगत प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. पोलीस प्रशासनाला स्थानिक मदतीसाठी अनेक गावांमध्ये शांतिदूत तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.परिसराचा होणार मोठ्या प्रमाणावर विकास१ जानेवारीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पेरणे, कोरेगाव भीमासह वढू बुद्रुक परिसराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात असतानाच या भागात मोठी औद्योगिक क्रांती झाली आहे. परिसरात शांतता असेल तर मोठमोठे उद्योग या ठिकाणी येऊन स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Puneपुणे