शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

दीनानाथ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात विसंगती; राष्ट्रवादी कोर्टात जाणार - सुप्रिया सुळे

By राजू हिंगे | Updated: April 20, 2025 16:27 IST

पहिल्या दिवशी त्यांनी जे स्टेटमेंट केलं आणि आज त्यांचं जे स्टेटमेंट आहे, यात मिस मॅच आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.

पुणे :दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट केलं होतं. माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या की, महाराष्ट्राच्या लेकीला न्याय देतील. मात्र, पहिल्या दिवशी त्यांनी जे स्टेटमेंट केलं आणि आज त्यांचं जे स्टेटमेंट आहे, यात मिस मॅच आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत आम्ही कोर्टातदेखील धाव घेत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. हा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न आहे का? गुन्हा उशिरा का होईना दाखल झाला, त्याचे मी स्वागत करते. महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत आम्ही कोर्टातदेखील धाव घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप न्यायालयात जाणार आहेत. एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून चार अहवाल तयार करण्यात आले आहेत. मात्र, या अहवालामध्ये अडकण्यापेक्षा सत्य जे आहे, त्याच्यावर फोकस राहणं आवश्यक आहे. कुठला अहवाल काय म्हणतो, यात अडकायला नको, असंदेखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

बीडमध्ये बदल होताना दिसत नाही

बीडमधील वकील महिलेला मारहाण प्रकरणामध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बीडमध्ये नक्की काय सुरू आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एवढं सगळं होऊनसुद्धा बीडमध्ये बदल होताना दिसत नाही. चालक असलेल्या एका तरुणाचं किडनॅपिंग झालं असल्याची बीडमधील एक घटना माझ्यासमोर आली आहे. याबाबत पोलिस कोणतीही कारवाई करत नसल्याने या तरुणाच्या कुटुंबातील सदस्य माझ्या भेटीला आले होते. याबाबत मी पोलिस अधीक्षकांशी बोलले आहे. मात्र, बीडमध्ये दहशत नेमकी कुणाची आहे. की बीडमध्ये वर्दीलादेखील कुणी घाबरत नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

ठाकरे बंधू युतीवर आनंद

उध्दव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला आनंदच आहे. कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. कुटुंब एकत्र झालं आहे. त्याचा आनंद साजरा करू द्या. हा संस्कृत महाराष्ट्र आहे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटावा, हीच आपली संस्कृती असल्याचं, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Deenanath Mangeshkar Hospitalदीनानाथ मंगेशकर रुग्णालयMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटलPuneपुणेWomenमहिलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळे