शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देवदिवाळीनिमित्त उजळले चिंतामणी मंदिर; सुश्राव्य भजनांनी भाविक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:18 IST

थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री चिंतामणीस जरतारी पोषाख घालण्यात आल्याने श्री ची मूर्ती विलोभनीय दिसत होती.

ठळक मुद्देदेवदिवाळीचे औचित्य साधून थेऊर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजनश्री चिंतामणीस जरतारी पोषाख घालण्यात आल्याने श्री ची मूर्ती दिसत होती विलोभनीयपारंपरिक पद्धतीने मातीच्या पणत्या लावून साजरा करण्यात आला दीपोत्सव

लोणी काळभोर : देवदिवाळीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री चिंतामणीस जरतारी पोषाख घालण्यात आल्याने श्री ची मूर्ती विलोभनीय दिसत होती.मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी देवदिवाळी निमित्त श्रींना जरतारी पितांबर, उपरणे आदी भरजरी महावस्त्रे घालण्यात आली. तर रिद्धीसिद्धीची खणानारळाने ओटी भरण्यात आली. चिंतामणीस मुगुट, हार, शुंडा, नाग, मोर, पोवळे, आदी रत्नजडीत अलंकारासमवेत रूद्राक्ष माळा घालण्यात आल्याने अगोदरच सर्वागसुंदर असलेल्या श्रींच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती. या दिवशी रविवार असल्याने दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी श्रीचे पुजारी आगलावे बंधू यांचे वतीने सुश्राव्य भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना त्रास होवू नये म्हणून चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे हे सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. यावेळी मंदिरपरिसरात आकर्षक अशी विविधरंगी एलइडी दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. याचबरोबर पारंपरिक पद्धतीने मातीच्या पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

टॅग्स :Puneपुणे