शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हामुळे शेअरल सायकलचा प्रतिसाद मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 15:17 IST

वाढत्या तापमानामुळे पुणे स्मार्ट डेव्हल्पमेंट काॅर्पाेरेशनच्या वतीने सुरु करण्यात अालेल्या स्मार्ट सायकल शेअरिंग या याेजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर एफसी, जेएम राेडवरील सायकलींची संख्या कमी झाली अाहे.

पुणे : दिवसेंदिवस तापमानात माेठी वाढ हाेतीये. लाेक दुपारच्यावेळी घराबाहेर पडत नसल्याचे चित्र अाहे. कडक उन्हामुळे घामाच्या धारा निघत अाहेत. त्यामुळे पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्यात अालेल्या सायकल शेअरिंग याेजनेला प्रतिसाद कमी हाेत असल्याचे चित्र अाहे. गेल्या काही दिवसांपासून या सायकल वापरण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाले अाहे. त्याचबराेबर विविध सायकल स्टेशन्सवर असलेल्या सायकलींचे प्रमाणही खूपच कमी झाले अाहे.     पुणे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशनच्या वतीने तसेच पेडल या कंपनीच्या सहकार्याने स्मार्ट सायकल शेअरिंग याेजना शहरात सुरु करण्यात अाली. यात अर्ध्या तासाला एक रुपया या दराने सायकल भाड्याने घेता येते.  सुरुवातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अाणि आैंध भागात ही याेजना प्रायाेगिक तत्त्वावर सुरु करण्यात अाली. या दाेन्ही ठिकाणी या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने शहराच्या इतर भागातही हि याेजना सुरु करण्यात अाली. त्या अंतर्गत पुण्याती एफसी राेड व जेएम राेडवर काही सायकल स्टेशन्स तयार करण्यात अाले. अश्याच प्रकारचे स्टेशन्स पुढे विधी महाविद्यालय रस्त्यावरही सुरु करण्यात अाले. सुरुवातीच्या काळात कुतुहलापाेटी अनेकांनी या सायकल्स चालविण्यास सुरुवात केली. या रस्त्यांवर तरुण-तरुणी या सायकल्स घेऊन फेरफटका मारत असल्याचे चित्र दिसत हाेते. मात्र जसजसा उन्हाचा पारा वाढत गेला. तसतसा या याेजनेला मिळणारा प्रतिसादही कमी हाेत गेला. प्रचंड उन्हामुळे घामाच्या धारा निघत असल्याने त्यात पुन्हा सायकल चालवाणे नागरिकांना कठीण जात अाहे. त्यामुळे सध्यातरी या याेजनेला ब्रेक लागल्याचे चित्र अाहे. तसेच सुरुवातील माेठ्याप्रमाणावर सायकल्स या सायकल्स स्टॅंण्डवर दिसत हाेत्या. सध्या मात्र हे प्रमाण कमालीचे कमी झाले अाहे.      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही सारखीच परिस्थीती असून विद्यापीठातले विद्यार्थ्यांनी सुद्धा सायकलचा वापर कमी केला अाहे. पेडल कंपनीनंतर युफाे या कंपनीच्या पिवळ्या रंगाच्या सायकल विद्यापीठात दाखल करण्यात अाल्या हाेत्या. या सायकल माेफत उपलब्ध करुन दिल्या हाेत्या. त्यामुळे याला विद्यापीठात माेठा प्रतिसाद मिळाला हाेता. सध्या मात्र विद्यापीठातून या सायकल गायब झाल्याचे चित्र अाहे. याबाबत बाेलताना विद्यापीठातील विद्यार्थी राहुल ससाणे म्हणाला, सुरुवातील विद्यार्थ्यांनी या  सायकल शेअरिंग याेजनेला खूप चांगला प्रतिसाद दिला. सध्या मात्र वाढत्या उन्हामुळे सायकल वापरण्याचे प्रमाण कमी झाले अाहे. त्याचबराेबर विद्यापीठातील पिवळ्या रंगाच्या सायकल या बाहेरील काही लाेकांनी चाेरुन नेल्याचे चित्र अाहे. तर हिरव्या सायकलींची संख्याही कमी झाली अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Cycle Schemeपुणे सायकल योजनाPune universityपुणे विद्यापीठ