शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या डायरी मागणीत घट ; दरवर्षी होते लाखोंची आर्थिक उलाढाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 12:07 IST

दरवर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला डायरी आणि कॅलेंडर विक्रीला सुरुवात होते.

पुणे: यंदा कोरोनामुळे पुस्तक, वही विक्रीत मोठया प्रमाणावर घट झाली आहे. दरवर्षी नववर्षाच्या डायरींच्या विक्रीत लाखोंची उलाढाल होत असते. यंदा  विक्रेते डायरी विक्रीवर अवलंबून राहिले होते. पण नववर्षाच्या डायरी मागणीतही घट झाल्याचे विक्रेत्यांनी लोकमतला सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये अजूनही सुरू झाली नाहीत. त्यामुळे शालेय वस्तू, वह्या, पुस्तके, स्टेशनरी या गोष्टींची विक्री झाली नाही. म्हणूनच पुस्तक आणि वही विक्रेते नववर्ष डायरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. 

दरवर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला डायरी आणि कॅलेंडर विक्रीला सुरुवात होते. अनुपम, सुदर्शन, स्टार वन, आनंद, अशा डायऱ्या बाजारात उपलब्ध असतात. तर धार्मिक डायरीबरोबरच गृहिणी, प्रवासी, लॉ अशा डायऱ्यांना मागणी असते. एका दुकानातून ५ ते १० हजार डायरी विकल्या जातात. तर जवळपास बाजारात लाखोंची आर्थिक उलाढाल होते. विक्रेत्यांकडून मोठमोठ्या कंपन्या, ऑफिसेस एकाच वेळी मोठ्या संख्येने डायऱ्या घेऊन जातात. या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या मध्यापर्यंत असंख्य डायऱ्यांची विक्री होत असते. यंदा डायरी उत्पादनातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. उत्पादकांकडून ५० टक्के साठा बाजारात आला आहे. त्यामुळे दुकानदारांकडेही दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात डायऱ्या उपलब्ध आहेत. तरीसुद्धा मागणीत वाढ दिसून येत नाहीये. 

विक्रेते विशाल सावला म्हणाले, कोरोनामुळे आधीच व्यवसाय कमी झाला होता. दरवर्षी आतापर्यंत ५ हजार डायरी विक्री झालेली असते. पण यंदा आता दोनशे डायऱ्या विकल्या गेल्या आहेत. कंपनी आणि ऑफिसेस ने अजून कुठल्याही प्रकारची विचारपूस केली नाही. नागरिक वैयक्तिक डायरी घेऊन जात आहेत. .......................आमच्याकडे ८० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत डायरी उपलब्ध आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने यंदा शालेय वस्तूंना मागणी नाही. दरवर्षी किमान महाविद्यालयातील तरुण मुले - मुली डायरी घेण्यासाठी येत असतात. तसेच मोठ्या संख्येने डायरी घेण्यासाठी कंपनी आणि ऑफिस कडून चौकशी केली जाते. पण यंदा आम्हीच त्यांना विचारत आहोत. तरीही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. दरवर्षी आमच्या सहा शाखातून ५० हजारच्या आसपास डायऱ्या विकल्या जातात. त्या तुलनेत यंदा ५० टक्के विक्री होणे अवघड वाटत आहे. - विनोद करमचंदानी, विक्रेते .........................दरवर्षी डायरीला मागणी असते. यावर्षी कोरोनामुळे बाजारात नववर्ष डायऱ्याचे प्रमाण कमी आहे. कंपनी यंदा कोणीही आलेच नाहीत. सगळे कोरोनाची कारणे देत आहेत. तसेच डिजिटलमुळेही डायरी वापरणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी झाले आहे. पंचांग, गृहिणी, रामदास, विवेकानंद अशा डायऱ्यांची वैयक्तिक विक्री होत आहे.- उत्कर्ष जोशी; विक्रेते

टॅग्स :Puneपुणे