शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

अनधिकृत बांधकाम प्रश्नी लवकरच निर्णय - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: February 18, 2017 17:55 IST

राष्ट्रवादीचा रिमोट कंट्रोल अजित पवारांच्या हातात आहे, आणि त्या फोनमध्ये एक रूपया टाकल्याशिवाय हॅलोचा आवाज येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीत केली.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. १८ -  दादा आणि बाबा यांच्या जोडीमुळे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रश्न सुटला नाही. मात्र, भाजपा सरकारने यावर निर्णय घेतलेला आहे. बांधकामे नियमितीकरणाचा अहवाल न्यायलयासमोर ठेवला आहे. त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल.  राष्ट्रवादीचा रिमोट कंट्रोल अजित पवारांच्या हातात आहे, आणि त्या फोनमध्ये एक रूपया टाकल्याशिवाय हॅलोचा आवाज येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीत केली.  
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप होते. व्यासपीठावर खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, माजी विरोधीपक्षनेत्या उमा खापरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘दुपारच्या उन्हात नेते आणि जनता सर्वच जण एकत्र आले आहेत. त्यामुळे महापालिकेत परिवर्तन निश्चित आहे. नेहमी नेते सावलीत आणि जनता उन्हात असते. मात्र, भाजपाच्या झेंड्याखाली सर्वचजण एकत्र आल्याने ही परिवर्तनाची नांदी आहे. भारतीय जनता पक्षाची विकासाची बॅक आहे. जनतेची बँक आहे. या बँकेत सामान्य माणसाने मत रूपाने ठेवलेले डिपॉडीट आम्ही पाच पट व्याजासह परत करणार आहोत. आपल्याकडे आणखी काही लोकांच्या बँका आहे. शरद पवार आणि अजित पवारांच्या बँकेत टाकलेले पैसे परत मिळत नाहीत. राहूल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची बँक अशी आहे, तिच्या कोठेही शाखा नाहीत. मताचे डिपॉझिट ठेवा विकास रूपाने व्याज परत करू. 
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाने दिलल्या आश्वासनांनुसार अनधिकृत बांधकामे नियमितीकरण प्रश्न राज्य सरकारने निर्णय घेतलेला बांधकामे नियमित करण्याचे धोरण न्यायालयापुढे सादर केले आहे. तसेच आघाडी सरकारने लादलेला जिझीयाकर अर्थात शास्ती रद्द करण्यासंदर्भात जीआर काढलेला आहे. विकासाची दृष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास साधायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला साथ द्यायला हवी.’’