शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाºयांचा निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:40 IST

न्यू कोपरे गावातील रहिवाशांची फसवणूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने या प्रकरणात चौकशी करून काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक खासदार संजय काकडे, सूर्यकांत काकडे आणि इतर संचालकांची फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. गोटे यांनी दिले आहे.

पुणे : न्यू कोपरे गावातील रहिवाशांची फसवणूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने या प्रकरणात चौकशी करून काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक खासदार संजय काकडे, सूर्यकांत काकडे आणि इतर संचालकांची फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. गोटे यांनी दिले आहे. वारजे पोलिसांनी अद्याप न्यायालयाकडून आदेशाची प्रत आली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे रात्री उशिरा सांगितले.न्यू कोपरे गावातील रहिवाशांनी १४ एकर जमीन सूर्यकांत काकडे यांना विकसनासाठी दिली होती. मात्र कागदपत्रात खाडाखोड करून एकूण ३८ एकर जमीन घेण्यात आली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. यापैकी महापालिकेला ७ एकर जमीन ‘अ‍ॅमिनिटी स्पेस’ म्हणून देण्यात आली. उर्वरित १७ एकर जमीन काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने बळकावल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यातील काही भागावर बांधकाम करण्यात आले, तर काही भागातील प्लॉट विकण्यात आले. याबाबत गावकºयांनी न्यायालयात धाव घेतली होती.एक रहिवासी दिलीप मोरे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रथमवर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. फसवणूक झाल्याचे दिसत असल्याने गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.काकडे यांच्याकडून यापूर्वी मांडलेल्या भूमिकेनुसार, पुनर्वसनाचा हा अधिकार जिल्हाधिकाºयांकडे होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या यादीनुसार पुनर्वसन करण्यात येत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करायला हवा.काही जणांची घरे नियमानुसार तयार करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी घेतलेली नाहीत. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाबाबत संजय काकडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय