शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या जामीन अर्जावर आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 07:10 IST

आर्थिक गुन्हा हा खुनापेक्षाही जास्त त्रासदायक असतो. पैशांच्या फसवणुकीत रक्त न सांडता कुटुंब उद्ध्वस्त होते.

पुणे : न्यायालयाने वेळोवेळी मुदत देऊनही डीएसके ५० कोटी रुपये जमा करू शकले नाही; तसेच त्यांनी वेळोवेळी न्यायालयाची दिशाभूल केली. असा व्यक्ती जर जामिनावर सुटला, तर ते काहीही करू शकतात; तसेच त्यांची पळून जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे डीएसके यांचा जामिनाचा अर्ज फेटाळावा, अशी विनंती विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्याकडे सरकारी पक्षाने केली.डीएसके यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी युक्तिवाद केला. त्या वेळी सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची वेळी मागीतली होती. त्यानुसार गुरुवारी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप चव्हाण यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून, त्यावर आज (शुक्रवारी) दुपारी चार वाजता निर्णय होणार आहे. आर्थिक गुन्हा हा खुनापेक्षाही जास्त त्रासदायक असतो. पैशांच्या फसवणुकीत रक्त न सांडता कुटुंब उद्ध्वस्त होते. डीएसके यांच्या कंपनीत काम करणाऱ्यांना १० महिन्यांचा पगार मिळालेला नाही; तसेच त्यांनी पोलिसांना स्वत:हून पासपोर्ट दिलेला नाही, तर पासपोर्ट जमा करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. डीएसके यांचा पासपोर्ट पोलिसांकडे असला, तरी त्यांचा मुलगा शिरीष आणि पत्नी हेमंती यांचा पासपोर्ट अद्याप त्यांच्याकडेच आहे. डीएसके यांचे सर्व प्रोजेक्ट पुर्ण झाले तरी त्यातून ठेविदारांना देण्याासाठी पैसे शिल्लक राहणार नाही, असा युक्तीवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी केला.विरोधात काही गट सक्रियडीएसके यांच्याकडे आत्ता पैसे नसले, तरी त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अनेक पार्टी भागीदारी करण्यासाठी तयार आहेत; मात्र आत्ताच्या वातावरणामुळे ते गुंतवणूक करण्यासाठी घाबरत आहे; तसेच त्यांनी गुंतवणूक करू नये यासाठी देखील काही गट सक्रिय आहे. डीएसके यांनी यापूर्वीदेखील अनेक जणांच्या रकमा परत केल्या आहेत. उर्वरित ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी आणि डीएसके यांच्या वयाचा व त्यांना असलेल्या आजाराचा विचार करून त्यांना ६ महिने जामीन देण्यात यावा. या काळात त्यांनी काही रक्कम परत केली नाही, तर जामीन रद्द करावा, असा युक्तिवाद अ‍ॅड. शिवदे यांनी केला.

टॅग्स :Puneपुणे