शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीहाजी परिसरात कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया खोळंबली, शेतकºयांच्या महा ई-सेवा केंद्रात फेºया  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:19 IST

टाकळीहाजी : टाकळीहाजीमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया सर्व्हर डाऊन होत असल्याने अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया खोळंबली असून हे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.शासनाने दिलेली कर्जमाफी ही अत्यंत जाचक निकष वापरून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजेतोंडात घास आणि मानेत बुक्का अशी अवस्था शेतकऱ्यांची ...

टाकळीहाजी : टाकळीहाजीमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया सर्व्हर डाऊन होत असल्याने अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया खोळंबली असून हे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.शासनाने दिलेली कर्जमाफी ही अत्यंत जाचक निकष वापरून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजेतोंडात घास आणि मानेत बुक्का अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. या कर्जमाफीचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये या शासनाविषयी चांगलीच नाराजी पसरली आहे. कारण अतिशय जाचक अटी वापरून ही कर्जमाफी असल्याने याचा फायदा कमी आणि त्रास जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिसरात अनेक शेतकरी अंगठेबहाद्दर असल्याने त्यांना कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी कुठे जावे काय करावे हेच माहीत नसल्याने ते भांबावून गेले आहेत. कारण इंटरनेट, आॅनलाईन, सर्व्हर काय आहे. आयुष्यात कधी माहिती नाही ते त्यांना आता ऐकायला मिळत आहे.शिवाय त्या ठिकाणी जाऊन फॉर्म कसा भरायचा याची किंचितही कल्पना नाही.तसेच फॉर्म आॅनलाइन भरताना त्यावर काय माहिती भरायची हेदेखील माहिती नाही. शिवाय हा फॉर्म भरताना पती-पत्नी बरोबर असल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने दिवसभर त्या कार्यालयात थांबावे लागत आहे. त्यामुळे महिलादेखील या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला पूर्णपणे वैतागल्या आहेत.कर्जमाफी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर असल्याने आता फक्त १० च दिवस शिल्लक राहिल्याने शेतकरी चांगलेच भेदरले आहेत. कारण दिवसा सर्व्हर डाऊन होत असल्याने या परिसरातील अनेक शेतकरी आॅनलाइन अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. दिवसा सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकरी रात्री व पहाटे आपल्या घरमालकिणीला अर्ज भरण्यासाठी घेऊन जात आहेत. या शासनाला जर खरोखरच कर्जमाफी द्यायची होती तर ही प्रक्रिया शासन कशासाठी राबवतेय. कारण शेतकऱ्यांच्या सर्व कर्जाबद्दल माहिती शासनदरबारी आहे.शिवाय प्रत्येक बँकांकडे ही माहिती उपलब्ध असताना शासन शेतकºयांचा का अंत पाहत आहे. यापूर्वी अनेक वेळा कर्जमाफी झाली. परंतु त्या वेळी असा काही प्रकार नव्हता .परंतु हे शासन शेतकºयांचे नसल्याने ते शेतकºयांची अशी क्रूर चेष्टा करीत असल्याची प्रतिक्रिया या परिसरातील महिला व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी