शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुरुळी यात्रेत फटाक्यांच्या आताषबाजीत भाजलेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:25 IST

यात्रेनिमित्त फटाक्यांच्या आताषबाजीसाठी संगमनेर येथील शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करणारे लोक बोलावण्यात आले होते.आताषबाजीचा खेळ सुरु असताना फटाक्यांची एक ठिणगी फटाक्यांच्या गोणीवर पडली. यामुळे सर्व फटाक्यांचा एकदम स्फोट झाला.

ठळक मुद्देभैरवनाथ महाराज ग्रामदैवताच्या पुजेनंतर गावात फटाक्याची आताषबाजीचे आयोजन

कुरुळी:  कुरुळी (ता.खेड) येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत दहा दिवसांपूर्वी भाजून जखमी झालेल्या तिघांपैकी एका युवकाचा पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रितेश विलास डोंगरे (वय १८ रा. कुरुळी, ता. खेड ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी (ता. खेड) यात्रेनिमित्त गावच्या भैरवनाथ महाराज ग्रामदैवताच्या पुजेनंतर रविवारी (दि. ८ एप्रिल) रोजी रात्री काराच्या सुमारास गावात फटाक्याची आताषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. या फटाक्यांच्या आताषबाजीसाठी संगमनेर येथील शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करणारे लोक बोलावण्यात आले होते. गावातील नागरिकांनीही यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गावातील आताषबाजीचा खेळ सुरु असताना फटाक्यांची एक ठिणगी फटाक्यांच्या गोणीवर पडली. यामुळे सर्व फटाक्यांचा एकदम स्फोट होऊन सय्यद करीम अब्दुल रहेमान ( वय ५५) अजय महागडे ( वय ३० दोघेही रा. मुगलपुरा , ता. संगमनेर, जि. अहमदनगर) व रितेश डोंगरे ( वय १८ ) हे तिघे भाजले होते. त्यातील रितेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सर्वाधिक भाजलेल्या अहमदनगरच्या अजय महागडे यांचीही प्रकृती चिंताजनक होती.दरम्यान रितेश डोंगरे कुरुळीच्या गोल्डन कुस्ती संकुल (डोंगरेवस्ती) कुस्ती खेळाचे प्रशिक्षण घेत होता. कुस्ती मध्ये रितेशने तालुका, जिल्हा पातळीवर विविध ठिकाणी यश मिळवले होते. रितेश याच्या पश्चात आई, वडील,तीन बहिणी, असा मोठा परिवार आहे. खेड केसरी पै.दिपक डोंगरे यांचा पुतण्या होता. 

टॅग्स :Khedखेडfire crackerफटाकेDeathमृत्यू