शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निमसाखर येथे मानमोडी रोगामुळे दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 20:06 IST

मानमोडी रोगामुळे पोल्ट्री फार्म कुटुंबाला तब्बल ४ लाख रुपयांचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांपूर्वी २० रुपये दराने  दोन हजार छोटी पिल्ले खरेदी करण्यात आले होते.मृत्यू पावलेल्या कोंबड्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी घटनाग्रस्त कुटुंबाकडून मागणी

वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर ) येथे मानमोडी रोगाने ग्रासलेल्या जवळपास २ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. कर्ज काढून ही गावरान कोंबड्यांची पोल्ट्री उभारण्यात आलेली असल्याने मानमोडी रोगामुळे या कुटुंबाला तब्बल ४ लाख रुपयांचा फटका बसला आहे. त्वरित या मृत्यू पावलेल्या २ हजार कोंबड्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी घटनाग्रस्त कुटुंबाकडून करण्यात आली आहे.        या घटनेची सविस्तर माहिती अशी की, निमसाखर हद्दीतील शेखवस्ती येथील रहिवासी असलेले बबन दिलावर शेख यांनी गावरान कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म उभारले होते . परंतु, सोमवारी एक कोंबडी जागेवर मृत्यू झाला. कालांतराने एकापाठोपाठ सर्वच कोंबड्या मान टाकू लागल्यामुळे शेख यांनी हतबल होऊन डाँक्टरांना संपर्क केला. त्यावेळी डॉक्टरांनी हे मानमोडी रोगाचे लक्षणे सांगितले. बघता बघता दिवसातून जवळजवळ दोनशे ते तीनशे कोंबड्या जागेवर पाय खोरून मृत्यूमुखी पडल्या. तीन दिवसांत जवळजवळ संपूर्ण पोल्ट्रीतल्या संपूर्ण कोंबड्यांचा मृत्यू झाला. शेख म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी २० रुपये दराने  दोन हजार छोटी पिल्ले खरेदी करण्यात आले होते.  साधारणपणे पालन पोषण करून एक कोंबडी तीन महिन्यात १ ते दीड किलो वजन भरेल एवढया मोठ्या होतात. त्याचप्रमाणे या खरेदी केलेल्या कोेंबड्यांची वाढ झाली होती. रविवारी या कोंबड्यांना खरेदी करण्यासाठी व्यापारी येणार होता.त्यामुळे शेख कुटूंबाची आर्थिकदृष्ट्या होणारी पिळवणूक थांबणार होती. मात्र, या दुर्दैवी घटनेने शेख कुटूंब आर्थिक कोंडीत सापडले आहेत. शासकीय आर्थिक मदत मिळाल्यास शेख कुटूंबाला मदत होणार आहे. ----------------------------------------------- 

टॅग्स :Indapurइंदापूर