शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना आई वडिलांचा दुर्दैवी मृत्यू, हवेली तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 18:18 IST

पाण्याजवळ खेळत असताना रणजित अचानक पाण्यात पडला.

लोणी काळभोर : कालव्यात बुडत असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आई - वडील पाण्यात उतरले. परंतू दुर्दैवाने भोवऱ्यात सापडून ते दोघेही मृत्युमुखी पडल्याची घटना कुंजीरवाडी ( ता. हवेली ) येथे घडली आहे. यांमध्ये मुलगा बचावला असून त्याचे आईचा मृतदेह सापडला आहे.      या घटनेत अशोक कश्यप ( वय ४० ) व त्यांची पत्नी सोनी अशोक कश्यप ( वय ३५ दोघे सध्या रा. कुंजीरवाडी, ता. हवेली. मुळ रा. गौसगंज, जि. हरदोय, उत्तर प्रदेश ) हे मृत्युमुखी पडले आहेत.

कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ही घटना शनिवार ( १६ मे ) रोजी दुपारी १ - ३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कश्यप पती - पत्नी हे आपल्या चार मुलांसमवेत राहतात. गेल्या चार महिने पासून दोघे नर्सरीमध्ये मजूरीकाम करून कुटुंब चालवत होते. दुपारी काम झाल्यानंतर ते दोघे आणि मोठा मुलगा रणजित ( वय ७) याच्यासह नवीन मुठा उजव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी आले होते.            पाण्याजवळ खेळत असताना रणजित अचानक पाण्यात पडला. मुलगा वाहून जात आहे हे लक्षात आल्यानंतर तर सोनी यांनी पाण्यात उडी मारली. येथून काही अंतरावर पाणी जास्त प्रवाहाने पुढे जावे यांसाठी कालव्याचे दोन्ही बाजूला अर्धगोल भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे तेथे पाण्यात भोवरे तयार होतात. मुलगा व पत्नी पिचिंगच्या पुढे भोवऱ्यानजीक जात आहेत हे पाहून अशोक यानी पाण्यात उडी मारली. काही क्षणातच अशोक कश्यप त्या ठिकाणी पोहोचले. परंतू दुर्दैवाने तेही भोवऱ्यात सापडले व पाण्याखाली गेले. थोड्या वेळाने सोनी यांना दोरी टाकून पाण्याबाहेर घेण्यात आले. परंतू तत्पूर्वी त्यांचे निधन झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत अशोक यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. कोरोनाचा प्रभाव वाढत आहे हे पाहून अशोक कश्यप हे आपल्या मुळ गावी परतण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतू तत्पूर्वीच पती - पत्नी दोघांचे निधन झाले.    

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे