शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयातून पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:29 IST

दारूचे व्यसन सोडल्याने शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पिंपरीच्या यशवंतराव स्मृती रूग्णालयात (वायसीएम) दाखल केलेला रूग्ण तेथून पळून गेला होता. या बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आला.

ठळक मुद्देरुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नातेवाईकांचा गोंधळ

पिंपरी : मद्याचे व्यसन सोडल्याने शारीरिक त्रास जाणवू लागल्याने पिंपरीच्या यशवंतराव स्मृती रूग्णालयात (वायसीएम) दाखल केलेला रूग्ण तेथून पळून गेला होता. या बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आला. मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच रुग्णालयात मृत व्यक्तीचे नातेवाईक जमा झाले. मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे रूग्णालयात तणावाचे वातावरण होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन देवराम सावंत (वय ४२, रा. भोसरी चक्रपाणी वसाहत)असे मृत रुग्णाचे नाव आहे. त्याला मंगळवारी (दि.८ मे )  रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या पाच सहा वर्षांपासून दारूचे व्यसन असलेल्या मोहन यांनी महिनाभरापासून दारू पिणे सोडले होते. कालांतराने त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना मंगळवारी ८ मे रोजी वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र,९ मे रोजी रात्री हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत गायब झाला. रूग्णालयातून रूग्ण गायब झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी रूग्णालयातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईक जवळच्या संत तुकारामनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेले. त्याचवेळी एका रूग्णाचा मृतदेह रूग्णालय आवारात आढळून आल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोलीस चौकीतून नातेवाईकांनी पुन्हा रूग्णालयाकडे धाव घेतली. रूग्णालय आवारात येवून पाहिले असता पळून गेलेल्या सावंत यांचा मृतदेहाची ओळख पटली.ओळख पटल्यावर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे रूग्णालयात तणावाचे वातावरण होते.सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, नातेवाईकांनी संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार रूग्णालयातून रूग्ण पळून जातो कसा? येथील सुरक्षा रक्षक करतात तरी काय? रूग्णालय परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे प्रकार का कैद होत नाहीत. रूग्णांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांना रूग्णालयात सोडण्यास मज्जाव करून कर्तव्यदक्ष असल्याचे भासविणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या समोर रूग्ण पळून जातात. हे लक्षात कसे येत नाही. अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करून मोहन सावंत यांच्या नातेवाईकांनी रूग्णालय व्यवस्थापनास धारेवर धरले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू