शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला निष्क्रिय आमदार म्हणणारे किती सक्रिय होते : दत्तात्रय भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 00:34 IST

इंदापूर तालुक्यात जो कामे करतो त्याचे नाव जनता घेतल्याशिवाय राहत नाही. मात्र, आम्हांला निष्क्रिय आमदार म्हणणारे किती सक्रिय होते,हे जनताच सांगेल

इंदापूर  - तालुक्यात जो कामे करतो त्याचे नाव जनता घेतल्याशिवाय राहत नाही. मात्र, आम्हांला निष्क्रिय आमदार म्हणणारे किती सक्रिय होते,हे जनताच सांगेल, असा टोला आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला.इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथे विश्रामगृह व वॉल कंपाउंड अशा ५ कोटी ७३ लाख रुपयांच्या पर्यटन विकासकामांचे भूमिपूजन आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भरणे बोलत होते.भरणे म्हणाले, सामान्यांसाठी काम करताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवूनच आपण मदत करणे आवश्यक आहे.गंगावळण पर्यटनस्थळ व्हावे म्हणून, महारुद्र पाटील यांच्यासह स्वत: मुंबईला फाईल घेऊन केलेल्या पाठपुराव्याला यश आले. यावेळी मंगलसिद्धीचे अध्यक्ष राजेंद्र तांबिले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पवार, अशोकराव घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. महारुद्र पाटील यांच्या प्रयत्नातूनच गंगावळण गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी किसनराव जावळे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, कार्याध्यक्ष अमोल भिसे, अरविंद वाघ, शिवाजीराव इजगुडे, अनिल बागल, तुषार घाडगे, राजेंद्र गोलांडे, जितेंद्र गिड्डे, उत्तरेश्वर गोलांडे, अनिल काळे, दत्तात्रय बाबर, वसंत आरडे, सरपंच देवीदास वगरे, उपसरपंच प्रतिभा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.जिल्हा परिषदेकडून २० लाख रुपये मंजूर...कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी अगोदरच हजेरी लावत सव्वा किलोमीटर वॉकिंग ट्रॅकसाठी १० लाख रुपये मंजूर व दोन सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रुपये असा एकूण २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. गंगावळण गावाला पर्यटनस्थळ म्हणून राज्यात ओळख निर्माण करून देऊ, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणPuneपुणे