शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जम्बोमधील रुग्णांच्या ‘रियल टाईम’ अपडेटसाठी डॅशबोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 21:21 IST

तब्येतीतील सुधारणा आणि बिघाडाची माहिती मोबाईलवर

ठळक मुद्देजम्बो रुग्णालयातील परिस्थिती हळूहळू सुधारतेय

पुणे : जम्बो रुग्णालयातील रुग्णांच्या तब्येतीमधील सुधार अथवा बिघाडाची माहिती आता अधिकारी व डॉक्टरांना ‘रियल टाईम’ मिळू शकणार आहे. त्यासाठी पालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली असून रुग्णांच्या बेड क्रमांकानुसार संबंधित रुग्णाची सद्यस्थिती समजू शकणार आहे. बेडला जोडलेल्या व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणांवरील माहिती थेट या यंत्रणेद्वारे समजू शकणार आहे.सोमवारपासून या डॅशबोर्डच्या सुविधेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.जम्बो रुग्णालयातील परिस्थिती हळूहळू सुधारु लागली आहे. वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने उपचारांमध्ये गती आली आहे. रुग्णांची संख्याही वाढविण्यात आली आहे. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. यासोबतच रुग्णांची माहिती मिळत रहावी, त्यांच्या उपचारांची माहिती आणि सद्यस्थितीची माहिती मिळावी याकरिता डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. या डॅशबोर्डवर खाटेच्या क्रमांकानुसार त्यावरील रुग्णाचे हृदयाचे ठोके, आॅक्सिजन, व्हेंटीलेटरवर दर्शविली जाणारी माहिती एकाच वेळी पाहता येणे शक्य झाले आहे. ज्या रुग्णांची तब्येत अत्यवस्थ असेल त्यांच्यापुढे लाल रंगाची पट्टी येते. त्यामुळे जे डॉक्टर शिफ्ट बदलल्यानंतर येतील त्यांना सर्वात आधी या रुग्णांची तपासणी करणे यामुळे शक्य होणार आहे.  पालिकेने सुरु केलेला हा डॅशबोर्ड डॉक्टर आणि अधिकाऱ्यांसाठी आहे. .....

महापौरांच्या हस्ते लोकार्पणरुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणालीचे औपचारिक उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अगरवाल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.=====या माहिती व्यवस्थापन प्रणालीमुळे रुग्णांना दाखल करून घेतल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंतच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जात आहेत. याठिकाणी कमांड रुम तयार केली आहे. आयसीयू, व इतर वॉर्डमधील रुग्णांवर प्रत्यक्ष होणारे उपचार, त्यांच्या प्रकृतीची स्थिती यांची माहिती येथील स्क्रीनवर डॉक्टरांना व व्यवस्थापनाला पाहता येईल, असे रुबल अग्रवाल यांनी सांगितले. तसेच, रुग्णांचा तपशील अंतर्गत डॅशबोर्डवर अपडेट केला जाणार आहे.======जम्बो कोविड रुग्णालयातील व्हिडिओ कॉल सुविधेमुळे रुग्णांशी थेट संवाद साधून विचारपूस करता येत असल्याने नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक नातेवाईकांनी व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णांसोबत संवाद साधला आहे.  या सुविधेमुळे नागरिकांच्या मनातील शंका, भीती दूर होत असून रुग्णांची ख्याली खुशाली समजत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdoctorडॉक्टर