शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी नदी परिसरात डासांचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 01:19 IST

आळंदी येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आळंदी - येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तर, येथील रुग्णालयात डासांनी चावलेल्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. या मुळे इंद्रायणी नदीत कुजलेली जलपर्णी तत्काळ काढण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे. इंद्रायणी नदीचे चौंडी घाटालगत परिसरातील गवतांसह झाडे झुडपांच्या साम्राज्याने नागरिकांतून नाराजी वाढली आहे.चिखली, कुदळवाडी, कुरुळी, चिंबळी परिसरातील रसायन व मैलामिश्रित सांडपाणी अनेक ठिकाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात येत असल्याने आळंदी परिसरात नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तसेच उन्हाने वाळलेली जलपर्णी कुजून चालली आहे. या जलपर्णीवर वाहून आलेला कचरा या ठिकाणी साचतो, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. ही कुजलेली जलपर्णी इंद्रायणी नदीबाहेर काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत. जलपर्णी काढून नदीपात्र प्रदूषणविरहीत करण्याची मागणी केली.आळंदीत नदी परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. यात इंद्रायणीनगर, गोपाळपूर, इंद्रायणी नदीलगतच्या दुतर्फा नागरिकांसह भाविकांना या डासांच्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना डास चावल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. आळंदी नगर परिषद प्रशासनाने कुजलेली जलपर्णी तसेच नदीकिनाऱ्यालगत दुतर्फा वाढलेले गवत व झाडाझुडपांचे साम्राज्य हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीत कुजलेली व साचलेली जलपर्णी हटाव मोहीम राबविण्यासह जंतुनाशक फवारणी, नदीचे परिसरात धुरीकरण करण्याची मागणी ही नागरिकांनी केली आहे.डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीमडोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याची मोहीम राबविण्यात आली. या वेळी डेंग्यूच्या आजाराला कारणीभूत असलेल्या डासांच्या अळ्यांची ठिकाणे नष्ट करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस देवकाते, डॉ. बी. एन. दडस, आरोग्य सहायक व्ही. एन. घुले, एन. एस. ठोके, बी. डी. नातू, एन. एम. लकडे, आरोग्य सेवक एस. एस. गोरे, एस. एस. उपाध्ये, विजय जगताप, जे. एम. दळवी तसेच आशा कार्यकर्त्या या सर्व आरोग्य विभागाने गावात कंटेनर सर्व्हे, पाणी पुरवठा नियंत्रण, ओटी टेस्ट, ताप रुग्ण तपासणी केली. नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी पाणी साठवणारी भांडी घासून पुसून कोरडी व रिकामी करावीत, पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा, अशा सूचना गावकºयांना केल्या .

टॅग्स :indrayaniइंद्रायणीnewsबातम्या