शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासल्याच्या पाणीवाटपात दुजाभाव, पाणीपुरवठा योजना धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:28 IST

खडकवासला कालव्याचे आवर्तन आले अन् बंद झाले; मात्र तरीही भादलवाडी, पळसदेव, पोंधवडी, मदनवाडी या तलावांत पाणी आलेच नाही.

पळसदेव : खडकवासला कालव्याचे आवर्तन आले अन् बंद झाले; मात्र तरीही भादलवाडी, पळसदेव, पोंधवडी, मदनवाडी या तलावांत पाणी आलेच नाही. त्यामुळे या तलावात पाणी सोडण्याबाबत दुजाभाव होत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.प्रत्येक वेळी या तलावात नावापुरते पाणी सोडण्यात येते. या वेळी मात्र खडकवासला कालव्याच्या आवर्तनामधून पाण्याचा एक थेंबही वरील तलावात आलेला नाही. त्यामुळे आम्ही कोणाचे काय केले, असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. चालू वेळी खडकवासला कालव्याचे आवर्तन आले. त्यामुळे तलावात पाणी येईल, अशी शेतकºयांची अपेक्षा होती; मात्र तलावांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. गावातील पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. शेतीचे झाले वाटोळ. ..आता प्यायला तरी पाणी येऊ द्या, ही लोकांची अपेक्षा आहे.गेल्या एक महिन्यापासून दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. तरीही जलसंपदा विभागाचे अधिकारी व तालुक्याचे लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन आहेत. संबंधित ग्रामपंचायतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा तलावांमध्ये पाणी आलेले नाही. त्यामुळे वरील सर्व तलाव कोरडे पडले आहेत.सध्याच्या परिस्थितीत तलावात पाण्याचा एक थेंबही नाही. पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. तरीही या कडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही जगावे की मरावे, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत दरवर्षी असते; मात्र या वर्षी पाणी नसल्याने एकही पक्षी आलेला नाही.

टॅग्स :Puneपुणे