शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी संकुल इमारत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:24 IST

खडकी येथील मुख्य बाजारपेठेतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुल इमारतीची मागील अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. इमारत कोसळून किंवा काही भाग पडून मोठी दुर्घटना येथे घडू शकते.

खडकी -  येथील मुख्य बाजारपेठेतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुल इमारतीची मागील अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. इमारत कोसळून किंवा काही भाग पडून मोठी दुर्घटना येथे घडू शकते. त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून मागणी होत आहे.खडकी बाजारात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे व्यापारी संकुल आहे. त्याचे बांधकाम जुने झाल्याने सदरची इमारत जीर्ण झाली असून, मोडकळीस आली आहे. इमारतीच्या चारही बाजूंनी स्लॅब आणि कठड्याचे प्लॅस्टर पडत आहे. इमारतीच्या छतावर आठ ते दहा फूट उंचीचे पिंपळाचे झाड आहे. त्यामुळे इमारतीला धोका पोहोचू शकतो. जिन्याचीही अवस्था वाईट आहे.धोकादायक इमारती, वाडे, जुनी बांधकामे हटविण्याबाबत दर वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात येते; मात्र आता खुद्द बोर्डाच्या मालकीची इमारत जीर्ण झाली असून, मोडकळीस आली आहे. त्यामुळे त्यांना नोटीस कोण देणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने संकुलाच्या या इमारतीच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. बाजारात नेहमीच गर्दी असते. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका आहे. या इमारतीचे प्लॅस्टर सातत्याने कोसळत आहे. त्यामुळे बांधकामातील सळया दिसू लागल्या आहेत. या इमारतीमधील सर्व दुकाने सुरू आहेत. दुकानदारांच्या जिवालाही धोका आहे. दुर्घटना होण्यापूर्वीच बोर्डाने येथे उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून आणि दुकानदारांकडून होत आहे. अनेक वर्षांपासून स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे इमारतीत सर्वत्र घाण आहे. येथे स्वच्छता मोहिम राबवून साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवून ठेकेदारामार्फत इमारतीची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येईल. तोपर्यंत स्वच्छता व इमारतीवर वाढलेले मोठे पिंपळाचे झाड त्वरित काढण्यात येईल.- कमलेश चासकर, नगरसेवक, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या