शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

घाटरस्ते बनतायेत धोकादायक

By admin | Updated: August 8, 2016 01:29 IST

वरंधघाट व आंबडखिंड घाटात, भोर-पसुरे-पांगारी रस्ता, नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, भाटघर धरण भागातील रस्त्यांवर वारंवार डोंगरातील दगड

भोर : वरंधघाट व आंबडखिंड घाटात, भोर-पसुरे-पांगारी रस्ता, नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, भाटघर धरण भागातील रस्त्यांवर वारंवार डोंगरातील दगड, मातीच्या दरडी पडून घाट बंद होत आहेत. रस्त्याला भेगा पडून रस्ता खचत आहे. यामुळे तालुक्यातून जाणारे घाटरस्ते आणि राज्यमार्ग व जिल्हा मार्गांची दुरवस्था झाली आहे. घाटरस्ते धोकादायक झाले आहेत. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्याची आपत्कालीन व्यवस्था संथ गतीने काम करीत आहे. ती फक्त कागदावरच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महाड-पंढरपूर मार्गावरील हिर्डोशी गावाजवळ रात्रीच्या वेळी दरड कोसळल्याने भोरवरून महाडकडे सिमेंटने भरलेला एक ट्रक, दोन एसटी बस, बोलेरो,भाजीपाल्याचा टेंपो व एक कंटेनर रोडवर पडलेल्या दरडीच्या चिखलमातीत अडकून बसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. जीवितहानी झाली नाही. त्यामुळे महाड बाजूकडून येणारी संपूर्ण वाहतूक धारमंडप पांगरी-पसुरे मार्गे वळवण्यात आली होती. दुपारी ४ ते रात्री ३ वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन जे.सी.बी.च्या मदतीने रस्त्यावरील दरड काढण्याचे काम सुरु होते. दुसऱ्या दिवशी रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला होता.महाबळेश्वरला जाणा-या पर्यटाकांचा मार्ग...नीरा देवघर धरण, निसर्गरम्य परिसर, डोंगरातून पडणारे धबधबे, वेडीवाकडी वळणे घेत जाणारा वरंध घाट तर आंबड खिंड घाटातून पडणारे धबधबे, डोंगरावरून दिसणारे मनमोहक दृश्य, मांढरदेवीला जाणारे भाविक व पाचगणी, महाबळेश्वरला जाणारे अनेक पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. मात्र या रस्त्यावरील डोंगर कमकुवत झाल्याने वारंवार दरड पडत आहे. रस्ता खचत असून वाहतूक ठप्प होत आहे. यामुळे या दोन्ही घाटांतील वाहतूक धोकादायक झाल्याने घाटात वाहने थांबविण्यास विरोध होत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ती फक्त कागदावरच असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. खानापूर गावठाणाच्या ओढ्यावरील पुलाला पडले भगदाडनेरे : खानापूर (ता़ भोर) येथील गावठाणात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाला पुराच्या पाण्याने भगदाड पडले आहे. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पूल वाहून जाण्याची शक्यता आहे़सलग चार दिवस वीसगाव खोऱ्यात मुसळधार पावसाने थैमान मांडले आहे़ खानापूर परिसरात वीसगाव खोऱ्यातील चार ओढ्यांचे पाणी एकत्र येऊन खानापूर येथील ओढ्याला मिळते. खानापूर गावाजवळच मोठा ओढा असून या ओढ्यावर चार ते पाच फूट उंचीचा पूल बांधण्यात आला आहे़ मात्र या पुलाची उंची कमी असून काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे़ दरवर्षी परिसरातील चार ओढ्यांचे पाणी एकत्र येऊन या खानापूर गावच्या पुलावरून जात असते. यामुळे पुलाला भगदाड पडणे, पुलाच्या खालील भराव वाहून जाण्याने हा पूल धोक्याचा बनत चालला आहे़