शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा पुराचा धोका, मुठा कालवा फुटीनंतर उद्भवत आहेत प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 02:39 IST

डायस प्लॉट : कालव्याची भगदाडे, एक वषापूर्वीच समस्येला फोडली होती वाचा

बिबवेवाडी : शहराचा पूर्व भाग व आजूबाजूतील गावांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी लागणारा पाणीपुरवठा करण्यासाठी कालवा तयार करण्यात आला. हा कालवा अनेक वस्त्या झोपडपट्ट्या यांच्या शेजारून वाहत जातो. परंतु पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे कालवा फुटून पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचे व शेतीच्या पाण्याचे नुकसान झाले.

हाच कालवा स्वारगेटच्या दिशेने गुलटेकडी येथील डायस प्लॉट झोपडपट्टीच्या शेजारून वाहत जातो. या भागातील कालव्याच्या संरक्षक भिंतीची ठिकठिकाणी पडझड झाली असून, काही ठिकाणी कालव्याच्या भिंतीचा पाया खचून गेला असून अशा खचलेल्या भिंतीतून पाणी झिरपत असल्यामुळे, कालव्याची भिंत कमकुवत होत आहे. त्यामुळे पाटबंधारे खाते व प्रशासनाने वेळीच अशा कालव्यांच्या भिंतीची पाहणी करून त्यावर तातडीने दुरुस्तीचे उपाय करावेत. अन्यथा काल झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. या भागातील कालव्यामध्ये नागरिक बिनधास्तपणे कचरा व निर्माल्य स्वच्छ पाण्यात टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येते.गुलटेकडी येथील डायस प्लॉट झोपडपट्टी व नागरी वसाहतीच्या शेजारून वाहत जाणाºया कालव्याच्या भिंतीची झालेली दुर्दशा. मागील वर्षी ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडली होती.(इनसेन्टमध्ये)झोपलेला पाटबंधारे विभाग१ कालच्या झालेल्या कालवा फुटीच्या दुर्घटनेनंतर कालव्यात पाणी सोडण्याचे बंद केल्यामुळे कालव्याच्या भिंतीची झालेली धोकादायक परिस्थिती व ठिकठिकाणी पडझड झालेली भिंतीची अवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु पाटबंधारे खाते व प्रशासनाने पुन्हा एकदा कालवाफुटीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट न पाहता वेळीच कालव्याच्या भिंतीची डागडुजी करण्यात यावी, अशी नागरिक मागणी करीत आहेत.२ मागील वर्षी ५ आॅक्टोबरला या विषयावर लोकमतमधून पाटबंधारे खाते, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी बातमी प्रसिद्ध झाली होती, परंतु पाटबंधाºयाचा हा कालवा ज्या भागातून जातो त्या भागात सत्तारूढ पक्षाचे आमदार व नगरसेवक यांचे संख्याबळ जरी जास्त असले तरी अशा गंभीर प्रश्नांवर त्यांनी कधीच लक्ष घातलेले दिसत नाही. त्यामुळे काल दुर्घटना झालेल्या भागातील नागरिकांचा रोष पत्करावा लागला.

टॅग्स :Puneपुणे