शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘दगडूशेठ’ हे देशाचे सांस्कृतिक वैभव - चंद्रकांत दळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:05 IST

पुण्यामध्ये गणेशोत्सवाला खूप महत्त्व आहे. सामाजिक भान ठेवून ट्रस्टने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. धार्मिक, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत कार्य निष्ठेने सुरू आहे. सामाजिक क्षेत्रातील हे कार्य इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. दगडूशेठ हे देशाचे सांस्कृतिक वैभव आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढले.

पुणे : पुण्यामध्ये गणेशोत्सवाला खूप महत्त्व आहे. सामाजिक भान ठेवून ट्रस्टने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. धार्मिक, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत कार्य निष्ठेने सुरू आहे. सामाजिक क्षेत्रातील हे कार्य इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. दगडूशेठ हे देशाचे सांस्कृतिक वैभव आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढले. ससून रुग्णालयातील बदल आणि खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे कामही ट्रस्टच्या माध्यमातून झाले आहे, असेही ते म्हणाले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग मित्रमंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा येथे करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन दळवी यांच्या हस्ते झाले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, हेमंत रासने, कुमार वांबुरे, सुवर्णयुग बँकेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत मगर, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते.महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी भीमण्णा जाधव व सहकाऱ्यांचे सुंद्रीवादन झाले. जितेंद्र भुरुक व रेशमी मुखर्जी यांनी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या हम दोनो दो प्रेमी, जाने कैसे कब कहा अशा विविध गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.दगडूशेठ गणपती मंदिराला ३४ वर्षे पूर्ण झाली. ट्रस्टतर्फे दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवात अनेक दिग्गज आपल्या कलेद्वारे गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करतात. गणपती मंदिराच्या दानपेटीतील दान सामाजिक कार्यासाठी, लोकोपयोगी कार्यक्रमांसाठी वापरले पाहिजे, अशी ट्रस्टची व कार्यकर्त्यांची धारणा आहे.- अशोक गोडसे

टॅग्स :Puneपुणे