शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्याप्रकरण: दोषारोपपत्रासाठी सीबीआयला मुदतवाढ, ४५ दिवसांचा अवधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 01:21 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआयने) शनिवारी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआयने) शनिवारी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली.या प्रकरणातील आरोपींवर बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (यूएपीए) वाढविल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी९० दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी सीबीआयने केली होती. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी ४५दिवसांत मुदत दिली आहे. सीबीआयच्या मागणीस विरोधकरीत मुदतवाढ देण्याचे अधिकार संबंधित न्यायालयाला नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकीलअ‍ॅड. धर्मराज चंडेल आणिअ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी केला होती. मात्र, मुदतवाढ देण्याचे अधिकार याच न्यायालयास आहे, असे स्पष्ट करीत कोर्टाने अंदुरे याने जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावला.गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि बंदूक अद्याप जप्त करायची आहे. तसेच हत्या २०१३ मध्ये झाली होती. त्यामुळे गुन्ह्यातील पुरावे शोधण्यासाठी वेळ लागणार असून त्यासाठी मुदत देणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने मुदतवाढ देताना सांगितले.तपासाची थेअरीडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कट कोणी रचला, त्यांच्यावर कोणी गोळ््या झाडल्या, शस्त्र कोणी पुरवले, रेकी कोणी केली, आरोपींना पळून जाण्यास कोणी मदत केली, अशी तपासाची थेअरी आता स्पष्ट झाली आहे.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर