शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डी. एस. कुलकर्णी यांच्या पैशांचा माग काढण्यासाठी लेखापरीक्षक, ३०१ मालमत्ता शोधून ताब्यात घेण्याचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 05:52 IST

पुणे : गुंतवणूकदार व फ्लॅटधारकांनी दिलेल्या पैशांची गुंतवणूक डी. एस. कुलकर्णी यांनी कोठे-कोठे केली, याचा माग काढण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे. याचबरोबर, डीएसके यांच्या ३०१ मालमत्ता शोधून काढून त्या ताब्यात घेण्याचा अहवाल जिल्हाधिका-यांना दिला आहे. त्यांनी पुढील कारवाईसाठी प्राधिकृत अधिका-याची नेमणूक केली आहे.गुंतवणूकदारांच्या ठेवी परत न केल्याने दाखल ...

पुणे : गुंतवणूकदार व फ्लॅटधारकांनी दिलेल्या पैशांची गुंतवणूक डी. एस. कुलकर्णी यांनी कोठे-कोठे केली, याचा माग काढण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे. याचबरोबर, डीएसके यांच्या ३०१ मालमत्ता शोधून काढून त्या ताब्यात घेण्याचा अहवाल जिल्हाधिका-यांना दिला आहे. त्यांनी पुढील कारवाईसाठी प्राधिकृत अधिका-याची नेमणूक केली आहे.गुंतवणूकदारांच्या ठेवी परत न केल्याने दाखल झालेला फसवणुकीचा गुन्हा सध्या उच्च न्यायालयाने डी़ एस़ कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना जामिनासाठी १५ दिवसांत न्यायालयात ५० कोटी रुपये भरण्याची अंतिम मुदत दिली आहे़ याबाबत येत्या १९ डिसेंबरला सुनावणी होईल. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपासअसून पोलिसांनी ड़ी एस़ कुलकर्णी यांच्या घरी तसेच विविध ठिकाणच्या कार्यालयांवर छापा घालून संबंधित सर्व कागदपत्रे, विविध कंपन्यांचे ताळेबंद जप्त केले़ त्यांच्या सर्व्हरवरील सर्व माहिती स्वत:कडे घेतली़ गुंतवणूकदार व फ्लॅट घेण्यासाठी डीएसके यांच्याकडे दिलेल्या पैशांचे नेमके काय झाले, पैसे नेमके कोठे गेले, याच्या व्यवहाराच्या हिशेबाची तपासणी करण्यासाठी पुणे पोलिसांना लेखापरीक्षकांची मदत आवश्यक होती. त्यासाठी पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटंट डी़ जे़ ठकरार यांची नेमणूक केली आहे़ डीएसके यांच्याशी संबंधित कागदपत्रे, ताळेबंद याची पडताळणी करून त्याचा अहवाल ते पोलिसांना देणार आहेत, असे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायकपोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगितले.दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांनी गुंतवणूक केलेल्या ३०१ मालमत्ता शोधून काढल्या असून, त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिका-यांना सादर करण्यात आला आहे़ या मालमत्तेसंबंधी पुढील कारवाई महसूल विभागाकडून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाºयांनी त्यासाठी वडगाव मावळच्या उपविभागीय अधिका-यांची नेमणूक केली आहे़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस.कुलकर्णीPuneपुणे