शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:51 IST

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त केल्या. डी. एस. कुलकर्णी यांना पोलीस कोठडी दिल्यानंतर गुन्हे शाखेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

पुणे- आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. डी. एस. कुलकर्णी यांना शुक्रवारी पुन्हा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. या गाड्यांची किंमत सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपये आहे.डी. एस. कुलकर्णी यांना दिल्लीत अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्याच रात्री त्यांना पोलीस कोठडीत त्रास झाल्याने रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या अहवालानंतर न्यायालयाने शुक्रवारी डीएसके दाम्पत्यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. पोलीस कोठडीत असताना त्यांना विचारलेल्या माहितीवरून त्यांच्याकडील आलिशान गाड्या या लॉ कॉलेज रोडवरील एका ठिकाणी ठेवल्या असल्याचे समजले. त्यानंतर सोमवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या ६ गाड्या ताब्यात घेतल्या. त्यात अडीच कोटी रुपयांच्या २ बीएम डब्ल्यू, १ कोटी ७५ लाख रुपयांची पोर्शे, ७५ लाख रुपयांच्या दोन टोयाटो कॅमे आणि ३३ लाख रुपयांची एम व्ही़ अगस्ता या दुचाकीचा समावेश आहे.याबाबत सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी सांगितले की, डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीच्या साधारण ३५ गाड्या असल्याची माहिती मिळाली आहे. या ६ आलिशान गाड्यांव्यतिरिक्त आणखी एक आॅडीही असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तिचाही शोध सुरू आहे़. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या आलिशान गाड्यांवर कोणतेही कर्ज नसल्याचे समजते़ हा तपास खूप किचकट आणि आर्थिक बाबींचा असल्याने त्यासंबंधीची कागदपत्रे मिळविणे व त्यांचा अर्थ समजावून घेऊन त्यानुसार चौकशी करण्याचे काम हे वेळखाऊ आहे. डी. एस. कुलकर्णी यांना अटक होऊपर्यंत सुमारे ४ हजार २०० जणांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यात आता वाढ होऊन त्यांचा आकडा आता ५ हजारांहून अधिक झाला आहे.डी़, एस. कुलकर्णी हे पोलिसांना आता तपासात सहकार्य करीत असले तरी ठेवीदारांना नेमका पैसा कोठे वापरला याची माहिती अजूनही ते देत नसल्याचे सांगण्यात येते. हा तपास खूप मोठा असल्याने पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेला जादा मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. पोलीस उपायुक्त पकंज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे