शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डी. एस. कुलकर्णी यांच्या शहरात आणखी २५ मालमत्ता, आर्थिक गुन्हे शाखेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 23:11 IST

ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षापासून येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या शहरात आणखी २५ मालमत्ता आढळून आल्या आहेत. 

पुणे  - ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षापासून येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या शहरात आणखी २५ मालमत्ता आढळून आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून घेण्यात आलेल्या सर्चमध्ये या मालमत्ता आढळून आल्या असून त्याच्यावरही जप्तीची कारवाई करण्यासाठी या मालमत्तांची यादी उपजिल्हाधिका-यांकडे सादर करण्यात आली आहे़ या जागांची किंमत सुमारे २०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे. सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयाच्या परवानगीनंतर डी एस के यांची चौकशी केली होती़ कुलकर्णी यांच्या परदेशातही मालमत्ता असल्याचे आढळून आले होते़ त्यावेळी कुलकर्णी यांच्या शहरात आणखी काही मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती़ धायरी भागात त्यांच्या १२ मालमत्ता असून पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी या भागात त्यांच्या मालमत्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे़ आर्थिक गुन्हे शाखेने या नव्याने आढळलेल्या २५ मालमत्तांची यादी उपजिल्हाधिका-यांना सादर केली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, मुलगा शिरीश कुलकर्णी, कंपनीतील अधिकारी धनंजय पाचपोर, मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली होती. डी़ एस़ के व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी हे सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत़ त्यांच्या विरोधात आतापर्यंत ३३ हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत़  त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे़ डी एस के पतीपत्नीं यांच्याविरुद्ध २८ आॅक्टोंबर २०१७ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर त्यांना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्लीहून अटक करण्यात आली होती़ त्यांच्या अडीचशे हून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून तसेच २ कोटी रुपयांहून अधिक किंमतीची चारचाकी व दुचाकी वाहने जप्त केली आहेत़ या मालमत्तेंचा तसेच वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी उपजिल्हाधिकाºयांनी न्यायालयाकडे मागितली आहे़ मात्र, त्यावरील सुनावणी गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी