शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सायकल शेअरिंग बासनातच; पुन्हा १ कोटी उचलले, १० कोटी झाडणकामाला वापरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 05:20 IST

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मोठ्या उत्साहात घोषणा केलेली सायकल शेअरिंग ही योजना आता बासनातच गेल्यात जमा झाली आहे. ट्रॅकही नाहीत व आता सायकलीही नाहीत, अशी स्थिती आली आहे.

पुणे : महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मोठ्या उत्साहात घोषणा केलेली सायकल शेअरिंग ही योजना आता बासनातच गेल्यात जमा झाली आहे. ट्रॅकही नाहीत व आता सायकलीही नाहीत, अशी स्थिती आली आहे. सायकल खरेदीसाठी राखीव ठेवलेल्या निधीतून पुन्हा१ कोटी रुपये दुस-याच कामासाठी वर्ग करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. याआधीही १० कोटी रुपये वर्ग करून घेण्यात आलेच आहे.स्वयंचलित दुचाकींचा वापर कमी व्हावा, सायकलींचा वापर वाढावा, या हेतूने आयुक्त कुणाल कुमार यांनी ही योजना जाहीर केली होती. त्यानुसार पुणे शहरात तब्बल८ हजार सायकली महापालिका खरेदी करणार होती. सायकलींसाठी स्वतंत्र स्थानके असणार होती. एका स्थानकात घेतलेली सायकल दुसºया स्थानकात जमा करता येणार होती. त्यामुळे सायकलींचा वापर वाढेल, असे गृहित धरण्यात आले होते. कमीतकमी शुल्क आकारून व तेही कार्डद्वारे सायकली देण्यात येणार होत्या. त्यासाठी म्हणून आयुक्तांनी अंदाजपत्रकात ४० कोटी रुपयांची तरतूद ठेवली होती. त्यातूनच आता हे पैसे वर्ग करून घेण्यात येत आहेत.महापालिका टेनिस स्पर्धा आयोजित करत आहे. त्यासाठी म्हणून या योजनेतील १ कोटी रुपये मंगळवारच्या स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेण्यात आले. प्रशासनानेच हा प्रस्ताव ठेवला होता. याआधी प्रभागांमधील झाडणकाम करणारांचे तब्बल ३ महिन्यांचे थकलेले वेतन देण्यासाठी म्हणून १० कोटी रुपये प्रशासनानेच वर्ग करून घेतले होते. तीन महिन्यांच्या वेतनासाठी हे पैसे खर्चही झाले. आता पुन्हा वेतन थकले की त्यासाठी पैसे मागावेच लागणार आहेत व तेही सायकल शेअरिंगमधूनच वळते करून घेतले जातील, असे दिसते आहे.- शहरात सायकलींसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या एकात्मिक शहर विकास योजनेतंर्गत निधी मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी म्हणून कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता, लॉ कॉलेज रस्ता अशा काही रस्त्यांवर ही व्यवस्था केली होती. मात्र, त्याचा वापरच होत नसल्यामुळे आता हे ट्रॅक अस्तित्वात राहिलेले नाहीत. तरीही नवे ट्रॅक तयार करण्यात येतील, असे सांगत आयुक्तांनी सायकल शेअरिंगची योजना पुढे केली होती. मात्र, त्याला आता सुरूंग लागत आहे.

टॅग्स :Puneपुणे