शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

सायबर फसवणुकीतील 141 तक्रारदारांना दिलासा ; पाेलिसांनी केली रक्कम परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 19:47 IST

लाॅकडाऊनच्या काळात सायबर क्राईमला बळी पडलेल्या नागरिकांना पाेलिसांनी दिलासा दिला आहे. फसवणुकीची रक्कम परत करण्यात आली आहे.

पुणे : मोबाईलवर आलेल्या एसएमएसद्वारे लाखो रुपये अकाऊंटला जमा होणार या आशेवर बसलेल्या ग्राहकाला गंडवण्याचे काम हॅकर्सकडून सुरूच आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील अनेकांना याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. ओटीपी शेअर करणे, बनावट लिंकला फॉलो करून बँक डिटेल्स देणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे फसवणूक झालेल्या 141 तक्रारदारांना सायबर विभागाकडून दिलासा मिळाला आहे. या तक्रारदारांना 57.77 लाख रुपये (फसवणूक झालेली रक्कम) परत करण्यात आले आहे. 

नागरिकांना सातत्याने सायबर फसवणुकीबाबत माहिती दिली जात असल्याने सायबर गुन्ह्यात फरक पडल्याचे दिसून आले आहे. विशेषतः लॉकडाऊन सुरू झाल्यापासून यात मोठ्या प्रमाणावर फरक पडला आहे. याबाबत अधिक माहिती देताना आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, सध्या ज्या तक्रारदारांना फसवणूकीची रक्कम परत देण्यात आली आहे. त्यात ऑनलाइन खरेदी विक्री करताना झालेली फसवणूक, एखाद्या मॅट्रिमोनिअल साईट वरून घालण्यात आलेला गंडा, तसेच ओटीपी शेयर करून लाखो रुपये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय क्रेडिट, डेबिट कार्ड धारक व्यक्तींच्या तक्रारीचा समावेश आहे. अशा 141 व्यक्तींना त्यांचे पैसे परत करण्यात आले आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. कुठल्याही प्रकारे आपली फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.आमिषाला बळी पडण्यात सुशिक्षित तरुण वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. लाख रुपयांच्या आमिषाला बळी पडून आपला अकाऊंट पासवर्ड तसेच ओटीपी ते शेयर करत असल्याने त्यांना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. 

साधारण 1 ते 15 एप्रिल 2020 या काळात पुणे सायबर पोलीस विभागाकडे 700 पेक्षा अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी ती संख्या 744 इतकी होती. तर सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात दिवसाला 5 ते 10 तक्रारी येत आहेत. 

सायबर फसवणुकीला बळी पडू नका याविषयी सतत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. व्हाट्स अप हॅकिंगचे प्रमाण आता कमी झाले आहे. सध्या इ कॉमर्स सुरू आहेत. यावर अनेकदा चुकीच्या लिंक वर क्लिक करून फसवणुकीला सामोरे जावे लागते. कुठलीही बँक ओटीपी मागत नाही. हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. त्यानुसार अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. - संभाजी कदम (पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा) 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसfraudधोकेबाजी