शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

इंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’..! पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 03:05 IST

फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे. त्या संदर्भातील शेकडो तक्रारी दरवर्षी दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.

- विशाल शिर्केपुणे : फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे. त्या संदर्भातील शेकडो तक्रारी दरवर्षी दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.फोर-जी जमान्यात कॉलची प्राथमिक सुविधादेखील पुरेशी सक्षम नसल्याचे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. तिच अवस्था फोर-जी इंटरनेट स्पीडबाबत दिसून येत आहे. आपण फाईव्ह-जी इंटरनेट स्पीडच्या तयारीला लागलो आहोत. मात्र फोर-जी इंटरनेटचा स्पीड खरेतर किती काळ आणि कधी मिळतो हा संशोधनाचा विषय ठरू शकतो, अशी स्थिती आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने इंटरनेट-ब्रॉडबँड संबंधीच्या तक्रारी आणि इंटरनेट स्पीड कमी असल्याच्या तक्रारी असे दोन स्वतंत्र रकाने केले आहे. त्यानुसार यावर्षी आॅक्टोबर अखेरीस एअरटेलच्या इंटरनेट सेवेबाबत तक्रार असणाºया ३२२ ग्राहकांनी अर्ज केला होता. तर इंटरनेटला खराब स्पीड असल्याचे १४५ ग्राहकांनी सांगितले होते. आयडियाच्या इंटरनेट सेवेबाबत आक्षेप घेणाºया ६२ आणि इंटरनेट खराब स्पीडबाबत २३ ग्राहक पुढे आले होते. संगणकसेवेबाबत आक्षेप घेणाºया आणि खराब इंटरनेट स्पीड असल्याच्या कारणावरून जिओच्या ४५ आणि ११७ ग्राहकांनी आणि व्होडाफोनच्या १२६ आणि ६४ जणांनी तक्रार दाखल केली होती. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते प्रफुल सारडा यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगरचे शाखा अध्यक्ष विजय सागर म्हणाले, ग्राहक पंचायतीकडे मोबाईलला इंटरनेट स्पीड नसल्याबाबत दररोज एक दूरध्वनी येतो. त्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्यास सांगण्यात येते. मात्र, त्यातील दहा टक्के ग्राहकदेखील पुढे तक्रारीसाठी जात नाहीत.पोर्टेबिलिटीला मिळेना दादमोबाईल क्रमांकदुसºया कंपनीमध्ये पोर्ट करण्यासाठी कोणत्याच कंपन्या उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. नवीन मोबाईल क्रमांक सुरू करण्यासाठी केवळ आधार कार्ड दिल्यास पुरेसे ठरते. त्यानंतर अवघ्या दोन तासांत नंबर मोबाईल कंपन्या करतात. मात्र मोबाईल क्रमांक सहजासहजी पोर्ट होत नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. आॅक्टोबर २०१७ अखेर एअरटेलच्या ८१९, आयडिया ५८९, जिओ २४ आणि व्होडाफोनच्या १ हजार २७५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. गेल्यावर्षी (२०१६) देखील आयडिया ५२२ आणि व्होडाफोनच्या ८१७ तक्रारी दाखलझाल्या होत्या.मोबाइल कॉल ड्रॉप आणि इंटरनेट स्पीड कमी असण्याचे प्रमाण खूप आहे. मोबाइल कंपन्या दररोज १-२ जीबी डाटा मोफतच्या अनेक योजना जाहीर करते. मात्र, आपला वापर किती झाला याची नोंद करण्याची सुविधा नाही. तसेच इंटरनेटचा स्पीड मोजता येत नाही. याबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे तक्रार करूनही त्याचे उत्तर दिले जात नाही. माझ्याकडे तसा पत्रव्यवहार पडून आहे. दुसरीकडे, मोबाइल कंपन्यांचे अधिकारी ग्राहकांना दाद देत नाहीत. मग ग्राहक तक्रार करणार कोणाकडे. - विलास लेले,अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोषाध्यक्ष, महाराष्ट्र

टॅग्स :Puneपुणे