शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या कामाचा सन्मान ही पुण्याची संस्कृती. - गिरीश बापट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:19 IST

यंदाच्या गणेशोत्सवात लाखो गणेशभक्त सहभागी झाले. परंतु या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार झाला नाही, याचे श्रेय पोलीस दलाला आहे. पोलिसांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन भावना ठेवल्या, त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. या चांगल्या कामाचा सन्मान करणे ही पुण्याची संस्कृती आहे.

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात लाखो गणेशभक्त सहभागी झाले. परंतु या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार झाला नाही, याचे श्रेय पोलीस दलाला आहे. पोलिसांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन भावना ठेवल्या, त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. या चांगल्या कामाचा सन्मान करणे ही पुण्याची संस्कृती आहे. सर्व सण-उत्सवात सलोख्याचे वातावरण ठेवू आणि विघातक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार नाही हा संदेश देवूया, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेशोत्सवात बंदोबस्त करुन सहकार्य करणाºया पोलीस दलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन विश्रामबाग फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, माजी आमदार मोहन जोशी, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, हेमंत रासने, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.शुक्ला यांच्यासह सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बाविस्कर आदींना सन्मानित करण्यात आले. तसेच पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांसह जय गणेश व्यासपीठातील गणेशोत्सव मंडळांच्या विश्वस्त आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.पहिल्यांदा पोलिसांचा सन्मान गणेशोत्सव मंडळाकडून झाल्याबद्दल आनंद वाटतो. जोपर्यंत आपण उत्सवात सूचनांचे पालन करणार नाही, तोपर्यंत अनुशासित उत्सव होणार नाही. पोलिसांवर मोठा ताण पडतो. पोलिसांनादेखील वाटते की गणपतीच्या दर्शनासाठी कुटुंबासह जावे. मात्र, त्यांना १४ ते १८ तास ड्युटी करावी लागते. त्यामुळे पोलिसांविषयी प्रत्येकाने माणुसकी दाखवली पाहिजे.- रश्मी शुक्लागणेशोत्सवात गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. छोट्या-मोठ्या चोºया रोखणे हेदेखील आव्हान होते. अनेक सामाजिक संस्थांची पोलिसांना उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. परंतु तरीही आपली व्यवस्था कमी पडली, हे खरे आहे. यापूर्वीच्या अनुभवावरुन नियोजन करणे गरजेचे असून, त्याकरिता अभ्यास सुरु आहे. यंदा देखील विसर्जन मिरवणुकीतील पथकांची संख्या मर्यादित राहिली नाही, पथकातील सदस्यांची संख्या ३० न राहता अगदी १००पर्यंत गेली. यामध्ये बदल केला तर मिरवणूक सकाळी ६ पर्यंत संपू शकेल.- रवींद्र सेनगावकरदरवर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक लांबत जाते. प्रत्यक्षात सूर्योदयापूर्वी ही मिरवणूक संपायला हवी. गणेशोत्सवात अनेक चुकीच्या परंपरा येत आहेत. त्यामध्ये हा उत्सव डॉल्बीमुक्त व्हायला हवा. तसेच पुढील वर्षी दहा दिवसांचा उत्सव ड्राय डे असायला हवा.- अशोक गोडसे 

टॅग्स :Puneपुणे