श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने संकष्टीनिमित्त पहाटे ५ वा. अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने दु. १२ वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. दर चतुर्थी प्रमाणे रांजणगाव गणपती येथील प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने अर्पण केलेल्या रंगबेरंगी फुलांची मंदिर व परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली. संकष्टी चतुर्थीनिमित्ताने शिरूर न्यायालयाचे न्यायाधीश एच. आर. हिंगणगावकर, राहता तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी श्री महागणपतीचे दर्शन घेतले.
तसेच संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीराम इलेक्ट्रिकल ॲंड ट्रान्सपोर्टचे मालक स्वप्निल खेडे (तळेगांव ढमढेरे), संजय जगताप (शिक्रापूर), भास्कर रामचंद्र भुसारे (शिरूर) यांच्याकडून प्रत्येकी ११ हजार रुपयांची अन्नदान देणगी देवस्थान ट्रस्टला देण्यात आली.
त्या वेळी देवस्थान ट्रस्टचे डॉ. संतोष दुंडे, विश्वस्त प्रा. नारायण पाचुंदकर, विश्वस्त ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशेबणीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी श्री महागणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.