शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

’देणे समाजाचे’ कार्य जगभरात पोहचण्याकरिता ‘क्राऊड फंडिंग’ उभारले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 16:05 IST

वीणा गोखले यांचे कार्य लघुपटाद्वारे जगभर पोहोचावे ही कल्पना खूप चांगली आहे...

ठळक मुद्देदानशूर व्यक्तींनी अर्थसहाय्य करण्याचे विक्रम गोखले यांचे आवाहन

पुणे : सलग चौदा  वर्षे देणे समाजाचे उपक्रम राबविणे हे काम सोपे नाही.  वीणा गोखले यांचे कार्य लघुपटाद्वारे जगभर पोहोचावे ही कल्पना खूप चांगली आहे. लघुपटाचे २५ टक्के काम झाले असून,  लघुपट विविध भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजाकडून निधी संकलित करून त्याद्वारे आवश्यक खर्च करण्यात येणार आहे. अनेकांना चांगल्या कामासाठी पैसे देण्याची इच्छा असते. पण, कोणाला द्यावेत हे समजत नाही. अशा दानशूर व्यक्तींनी या लघुपटासाठी अर्थसाहय करावे असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. 'देणे समाजाचे' उपक्रमाद्वारे वंचित घटकांसाठी कार्यरत १६५ संस्थांना गेल्या १४ वर्षांत समाजाकडून साडेचार कोटी रुपयांचे अर्थसाहय मिळवून देणा-या 'आर्टिस्ट्री' संस्थेच्या वीणा गोखले यांचे कार्य लघुपटाद्वारे जगभरात पाहोचणार आहे. लोकांकडून संकलित केलेल्या पैशांतून (क्राऊड फंडिंग) हा लघुपट निर्मित होत आहे. गेल्या वर्षी देणे समाजाचे प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी मांडण्यात आलेला हा विचार गोखले यांनी उचलून धरला. ३० मिनिटे कालावधीच्या या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी होणा-या खचार्ची जबाबदारी घेतली असून, ते या लघुपटाचे सदिच्छा दूत (ब्रँड अँबेसिडर) आहेत, अशी माहिती लघुपटाची निर्मिती करणा-या कम्युनिकेशन सपोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांनी शनिवारी दिली. गोखले म्हणाले, वंचितांना मदत मिळावी यासाठी समाजाकडून पैसे संकलित करण्याचे वीणा गोखले यांचे कार्य प्रशंसनीय आहे. वैयक्तिक आयुष्यातील संकटांना धीराने सामोरे जात सलग १४ वर्षे देणे समाजाचे उपक्रम राबविणे हे काम सोपे नाही. दानशूर व्यक्तींनी या लघुपटासाठी अर्थसाहय करावे.दीक्षित यांनी 'क्राऊड फंडिंग'द्वारे मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपावर आधारित लघुपटाची निर्मिती केली होती. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने हा लघुपट राष्ट्रीय अमूल्य जतन ठेवा (नॅशनल हेरिटेज) म्हणून नुकताच स्वीकारला आहे.

टॅग्स :PuneपुणेVikram Gokhaleविक्रम गोखलेShort Filmsशॉर्ट फिल्म