शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या खूनप्रकरणी उलटतपासणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 02:34 IST

दहशतवादी कातिल सिद्दीकीचा येरवडा जेलमधील अंडासेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून केल्याच्या खटल्यात फिर्यादी जेल अधिकारी चंद्रकिरण तायडे यांची उलटतपासणी शुक्रवारी पूर्ण झाली.

पुणे - दहशतवादी कातिल सिद्दीकीचा येरवडा जेलमधील अंडासेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून केल्याच्या खटल्यात फिर्यादी जेल अधिकारी चंद्रकिरण तायडे यांची उलटतपासणी शुक्रवारी पूर्ण झाली. सहा वर्षांनी या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.संशयित दहशतवादी मोहम्मद कातिल मोहम्मद जाफर सिद्दीकी उर्फ सज्जन उर्फ साजन उर्फ शहजादा सलीम (वय २७, रा बिहार) याचा येरवडा जेलमधील अंडासेलमध्ये ८ जून २०१२ रोजी गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कुख्यात गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३४, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड, ता. मुळशी) आणि आलोक शिवाजीराव भालेराव (२८, रा. मु.पो. मुठा, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील पाहत आहेत. मागील सुनावणीत या खटल्यातील फिर्यादी जेल अधिकारी चंद्रकिरण तायडे यांची साक्ष नोंदविण्यात आली होती. शुक्रवारी त्यांची उलटतपासणी पूर्ण झाली. या सुनावणीला कातिल सिद्दीकीचा भाऊ उपस्थित होता. या खटल्याची पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार आहे. जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी हा इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी होता.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे