शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दंगे घडणे हे राज्यांचे अपयश , विभूती नारायण राय यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 04:11 IST

राष्ट्रीय पोलीस अकादमीकडे या दंगलींच्या अभ्यासाचा अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवाल प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली.

पुणे - राष्ट्रीय पोलीस अकादमीकडे या दंगलींच्या अभ्यासाचा अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवाल प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली. या अभ्यासावरून पोलीस दलात काहीतरी बदल होईल असे वाटले होते; मात्र पोलीस दलाने या अभ्यासाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची खंत माजी पोलीस महासंचालक विभूती नारायण राय यांनी व्यक्त केली. तसेच, दंगे घडणे हे राज्यांचे मोठे अपयश असून, राज्यांना दंगलीची जबाबदारी घ्यावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.लोकवाङमय गृहतर्फे विभूती नारायण राय यांच्या विजय दर्प यांनी अनुवादित केलेल्या ‘जमातवादी दंगली आणि भारतीय पोलीस’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राय बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र कानगो, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. शशिकला राय आणि विजय दर्प उपस्थित होते. राय म्हणाले, ज्यावेळी समाजात दंगली घडतात, तेव्हा लोकांचा पोलिसांवरचाच नव्हे तर राज्यकर्त्यांवरचाही विश्वास उडतो. १६०९ मध्ये देशात पहिला जातीय दंगा झाल्याची नोंद आहे. १७०३ मध्ये बनारस येथे दंगा झाला होता. जातीय दंग्यात खाकी कपड्यातील पोलीस राज्याचे प्रतिनिधित्व करत असतो. पोलीस चांगले वर्तन करत असेल तर देश चांगले वर्तन करतो असे समजावे. राष्ट्रीय पोलीस अकादमीने मला १९९४ मध्ये शिष्यवृत्ती दिली. देशातील १० जातीय दंग्यांची निवड केली. माझ्या अभ्यासाचा अहवाल अकादमीकडे सादर केला. मात्र, त्यांनी तो प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली. या अहवालातून पोलीस दलात सुधारणा होईल असे वाटले होते मात्र तसे झाले नाही. २००४ मध्ये गुजरात दंगे घडले. मुस्लिम दंग्याची सुरुवात करतो, असा समज आहे; मात्र दंगलींमध्ये मुस्लिम सर्वाधिक बळी पडले आहेत. सरकारी आकडे कितपत विश्वासार्ह आहेत ते तपासायला हवे. ३० टक्के अल्पसंख्याक समाजाचा पोलिसांवर विश्वास नसेल तर हा देश कसा प्रगती करेल, दंगे हे राज्याचे अपयश आहे संविधान धोक्यात आहे. निवडणुकांच्या काळात जनताही आम्हाला स्वच्छ पोलीस हवा अशी मागणी का करीत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.दंगली का घडतात? याबद्दल चर्चा कुणीच करीत नाही, असे सांगून अशोक धिवरे यांनी दंगलीमागच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला. हिंसाचारातून दुसऱ्या समाजामध्ये पूर्वग्रहदृष्टिकोन तयार केला जातो. दंगलीतून भावनिक व बौद्धिक स्तरावर निर्माण केल्या जातात. हिंसेचे तर्क हे कालसापेक्ष असते. दंगली मुस्लिम सुरू करतात हे पसरवले जाते.बºयाच घटना या परिस्थितीशी विसंगत असतात, त्याच्यामागे धार्मिकता हेच कारण असते. दंगली या नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केल्या जातात. यातच दंगलींमध्ये पोलिसांचे वर्तन हे पक्षपाती असते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.यासाठी पोलीस दलात अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढले पाहिजे. पोलिसांना सर्वधर्मसमभावाबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. राज्यात दंगली घडल्या, तर फौजदाराला गुन्हेगार ठरवले जाते. पण, जिल्हाधिकाºयाला शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. यासाठी दंगलीची जबाबदारी निश्चित करून त्याला संविधानिक रूप देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कानगो म्हणाले, ‘अल्पसंख्याक समाजाला पोलीस समाजाचे ऐकतात असे वाटते, तर अल्पसंख्याक समाजाचे लाड केले जातात असे बहुसंख्याक लोकांना वाटते, हा तिढा कसा सोडवणार?’ हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या