पुणे : शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल शाम भरगुडे (वय २१, रा. शुक्रवार पेठ, साठे कॉलनी) याला पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला. भरगुडे सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात खुनाचा कट रचणे, स्वारगेट पोलीस ठाण्यात दुखापत करणे, घरात घुसून मारहाण आणि हत्यार बाळगल्याचे ३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात २०१६ मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. बसवराज तेली यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यांनी भरगुडेला शहर व जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपारचा आदेश दिला. पो. नि. राजेंद्र मोकाशी, संभाजी शिर्के, अनंत व्यवहारे, संजय गायकवाड, सर्फराज शेख, महेश कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली.
शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल भरगुडे तडीपार; २०१६मध्ये झाली होती प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:21 IST
शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल शाम भरगुडे (वय २१, रा. शुक्रवार पेठ, साठे कॉलनी) याला पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला.
शुक्रवार पेठेतील सराईत गुन्हेगार राहुल भरगुडे तडीपार; २०१६मध्ये झाली होती प्रतिबंधात्मक कारवाई
ठळक मुद्देपोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिला राहुल भरगुडे (वय २१) याला तडीपार करण्याचा आदेशभरगुडे सराईत गुन्हेगार, त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल