शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

खोदकामात वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 15:55 IST

दापोडी येथील खोदकामात ११ केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी महावितरणकडून शनिवारी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगणेशनगरमध्ये ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खोदकामात महावितरणची ११ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडली.याप्रकरणी महावितरणकडून भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे : दापोडी येथील खोदकामात ११ केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी महावितरणकडून शनिवारी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.दापोडी येथील गणेशनगरमध्ये गुरुवारी (दि. १९) ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरु असलेल्या खोदकामात रात्री १०.१५ वाजता महावितरणची ११ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे या वीजवाहिनीवरील सुमारे ३६ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. दापोडीचे सहायक अभियंता मंगेश सोनवणे व जनमित्रांनी तातडीने पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना सुरु केली. २८ रोहित्रांवरील वीजग्राहकांचा वीजपुरवठा लगेचच सुरळीत केला. उर्वरित ८ रोहित्रांवरील सुमारे १२०० वीजग्राहकांना पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे तुटलेली वीजवाहिनी दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले. वीजवाहिनीला दोन ठिकाणी जॉइंट दिल्यानंतर रात्री १२.१५ वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला.गणेशनगरमधील या खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने दापोडी व गणेशनगरमधील सुमारे १२०० ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित होता. तसेच महावितरणचेही सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी महावितरणकडून भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे