परवानगीशिवाय मंडप टाकणाऱ्या १२ मंडळांवर गुन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:00 PM2018-09-21T22:00:05+5:302018-09-21T22:04:39+5:30

शहरामध्ये सुमारे १२ गणेश मंडळांनी महापालिका अथवा पोलिस कोणाचीही परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीने या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Crimes against 12 ganesh mandal at pune | परवानगीशिवाय मंडप टाकणाऱ्या १२ मंडळांवर गुन्हे 

परवानगीशिवाय मंडप टाकणाऱ्या १२ मंडळांवर गुन्हे 

Next
ठळक मुद्देमहापालिका : न्यायालयाच्या आदेशानुसार प्रथमच कारवाईरस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीने या मंडळांवर गुन्हे दाखल शहरामध्ये ६१ मंडळांनी न्यायालयाने मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास

पुणे : गणेशोत्सवात परवानगी शिवाय रस्त्यावर मंडप टाकणा-यावर न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरामध्ये सुमारे १२ गणेश मंडळांनी महापालिका अथवा पोलिस कोणाचीही परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीने या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकणा-या गणेशमंडळांवर गुन्हे दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
    गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर मंडप टाकले जातात. यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने रस्त्यांवर मंडप टाकण्यास बंदी घातली आहे. पोलिस आणि महापालिकेची परवानगीने घालून दिलेल्या निबंर्धाचे पालन करूनच मंडप टाकण्यास परवानगी न्यायालयाने दिली. शहरांमध्ये अशा प्रकारेच नियमांचे उल्लंघन करणा-या गणेश मंडळाची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र मंडप तपासणी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पुणे शहरामध्ये तापसणी केली असता शहरामध्ये ६१ मंडळांनी न्यायालयाने मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने या ६१ मंडळांचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने पुन्हा सर्व मंडळाची तपासणी करून १२ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
----------
गुन्हे दाखल करण्यात आलेली मंडळे
जय महाराष्ट्र गणेश मंडळ (घोरपडी), सुर्वण मित्र मंडळ (घोरपडी), मार्तंड मित्र मंडळ (वठारे मळा, घोरपडी), जय भोलेनाथ जगननाथ मित्र मंडळ  (बोपडी), अमरज्योती क्रिडा मंडळ , नाईक चाळ (बोपडी), अखील दत्तवाडी उत्सव कमिटी मंडळ (पर्वती),  जयमहाराष्ट्र मित्र मंडळ (दांडेकर पुल), त्रिमुर्ती मित्र मंडळ (पानमळा), अष्टविनायक मित्र मंडळ, शाहू कॉलेज रोड (पर्वती), लोकाशाहीर अण्णाभाऊ साठे  मित्र मंडळ( पर्वती), अलकार मित्र मंडळ, साने गुरुजी नगर (पर्वती)

Web Title: Crimes against 12 ganesh mandal at pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.